Sanchar Sathi App:प्रत्येकाच्या फोनमध्ये संचारसाथी ॲप अनिवार्य, वैशिष्टये काय ?

0
Sanchar Sathi App: प्रत्येकाच्या फोनमध्ये संचारसाथी ॲप अनिवार्य, वैशिष्टये काय ?
Sanchar Sathi App: प्रत्येकाच्या फोनमध्ये संचारसाथी ॲप अनिवार्य, वैशिष्टये काय ?

नगर : आज आपल्या प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे आणि हाच स्मार्टफोन आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. मात्र हाच फोन कधी हरवला, हॅक झाला तर आपल्याला मोठा मनस्ताप होतो. मात्र आता या त्रासापासून तुमची मुक्ती होणार आहे. कारण सरकारने यासाठी एक नवीन ॲप लाँच केलं आहे. या ॲपचे नाव संचारसाथी (Sanchar Sathi App) आहे. आता तुमच्या मोबाईलमध्ये संचारसाथी हे अ‍ॅप्लिकेशन बाय डिफॉल्ट देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या अ‍ॅप्लिकेशनला तुम्हाला अन इन्स्टॉल करता येणार नाही. मात्र सरकारने हा निर्णय नेमका का घेतला? आणि या ॲपची वैशिष्ट्ये (App features) काय ? हे जाणून घेऊ…

नक्की वाचा: आता सगळ्या स्मार्टफोनमध्ये असणार संचारसाथी ॲप,इच्छा असूनही Delete करता येणार नाही  

सरकारने हा निर्णय का घेतला ? (Sanchar Sathi App)

भारतामध्ये दिवसेंदिवस सायबर घोटाळे होत आहेत आणि त्याला रोखण्यासाठी सरकारने हे ॲप प्रत्येक मोबाईलमध्ये इन्स्टॉल करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तसेच नागरिकांची होणारी सायबर फसवणूक, टेलिकॉम गैरवापर रोखणे, मोबाइल चोरी आणि तस्करी रोखणे तसेच नागरिकांची सुरक्षितता आणि जागरूकता वाढविण्यासाठी सरकारने हे संचार साथी अ‍ॅप अनिवार्य करण्याचा निर्णय घेतलाय.

अवश्य वाचा: धनंजय मुंडे यांची हत्या झाली असती पण ते वाचले; रासप आमदाराच्या दाव्याने खळबळ 

संचार साथी ॲपची प्रमुख वैशिष्ट्ये (Sanchar Sathi App)

आपल्या नावावर किती मोबाइल कनेक्शन सक्रिय आहेत याची माहिती ॲप आपल्या मोबाईलमध्ये असल्यावर मिळते.
हरवलेला किंवा चोरी गेलेला मोबाइल फोन रिपोर्ट करून त्याला ब्लॉक करण्याची सुविधा देखील  ॲपमुळे आपल्याला मिळणार आहे
फसवणूक करणारे वेब लिंक्स सहजपणे रिपोर्ट करता येतात.
बँक आणि वित्तीय संस्थांचे अधिकृत संपर्क क्रमांक तपासता येतात.
संशयित फ्रॉड किंवा स्पॅमची तक्रार त्वरीत नोंदवता येते.
वापरात असलेला मोबाइल हँडसेट मूळ आहे की, नकली याची पडताळणी करता येते.
भारतीय नंबरसारखे दिसणारे आंतरराष्ट्रीय कॉल्स रिपोर्ट करता येतात.
                                 अशी ही ऍपची  वैशिष्ट्ये आहेत. मात्र दुसरीकडे विरोधकांनी आरोप करत सरकारला धारेवर धरले आणि आता हेरगिरी करायची आहे का,असा सवालही उपस्थित केला. त्यामुळे भविष्यात अँपच काय होणार हे पाहणे गरजेचं आहे.