Accident : केडगाव लिंक रोडवर अपघाताची मालिका; गतिरोधक बसवण्याची मागणी

Accident : केडगाव लिंक रोडवर अपघाताची मालिका; गतिरोधक बसवण्याची मागणी

0
Accident : केडगाव लिंक रोडवर अपघाताची मालिका; गतिरोधक बसवण्याची मागणी
Accident : केडगाव लिंक रोडवर अपघाताची मालिका; गतिरोधक बसवण्याची मागणी

Accident : नगर : केडगाव येथील लिंक रोडवर (Kedgaon Link Road) वाढत्या अपघातांच्या पार्श्‍वभूमीवर प्रमुख चौकाच्या ठिकाणी तातडीने गतिरोधक बसवावेत, अशी मागणी जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (Public Works Department) करण्यात आली आहे. भाजप युवा मोर्चाचे (BJP Yuva Morcha) सुजय मोहिते यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देत या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले आहे.

अवश्य वाचा : शिर्डीत एका महिलेच्या नावे दुसऱ्याच व्यक्तीने केले मतदान

सतत अपघाताचा धोका

केडगावमधील लिंक रस्ता गेल्या सहा महिन्यांपासून पूर्ण क्षमतेने सुरू आहे. या मार्गावरील वाहतुकीत मोठी वाढ झाली आहे. हा रस्ता भूषणनगर, अयोध्यानगर, साईनगर भागातून जात आहे. त्यामुळे नेहमीच येथे गर्दी असते. अनेक चौकांमध्ये भाजी मार्केट आणि नागरिकांची सततची वर्दळ असल्याने या रस्त्यावर सतत अपघाताचा धोका निर्माण होत आहे.

नक्की वाचा : जिल्ह्यात ४ डिसेंबरपर्यंत थंडीच्या लाटेची शक्यता; दक्षता घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

नागरिकांना रस्ता ओलांडणे कठीण (Accident)

केडगाव बायपासवरील टोलनाका टाळण्यासाठी अनेक अवजड वाहने या लिंक रोड कडे वळत आहेत. ही वाहने भरधाव वेगाने धावत असल्याने नागरिकांना रस्ता ओलांडणे कठीण होते. त्यामुळे या परिसरात ठीक ठिकाणी गतिरोधक बसवावे अशी मागणी केली.