Highest Debt Country : २०२५ या वर्षात जागतिक अर्थव्यवस्था (Global Economy) ही अधिक कठीण काळातून जात आहे. आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या (IMF) नव्या अहवालानुसार सार्वजनिक कर्ज (Public Debt) झपाट्याने वाढत आहे. २०३० पर्यंत हे कर्ज जगाच्या एकूण GDP च्या जवळपास पोहचू शकते. हा कोणत्याही अर्थव्यवस्थेसाठी गंभीर इशारा मानला जातो. IMF ने GDP च्या टक्केवारीवर आधारित जगातील सर्वाधिक कर्जबाजारी (Highest Debt Country) १० देशांची यादी जाहीर केली आहे.
नक्की वाचा : प्रत्येकाच्या फोनमध्ये संचारसाथी ॲप अनिवार्य, वैशिष्टये काय ?
कर्जबाजारी देशांची यादी (Highest Debt Country)
१. जपान सर्वात कर्जबाजारी देश

आंतरराष्ट्रीय नाणे निधीने जाहीर केलेल्या यादीनुसार जपान पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचे कर्ज GDP च्या जवळपास अडीचपट आहे. वृद्ध होत चाललेली लोकसंख्या, आरोग्य सेवा खर्च आणि मंद आर्थिक वाढ हे त्यामागील प्रमुख घटक आहेत. जपानचे कर्ज १,०८१.१ अब्ज डॉलर इतके आहे.
२. सुदान

कर्जबाजारी देशांच्या यादीत सुदान हा देश दुसऱ्या क्रमांकावर आहे. सततचे गृहयुद्ध, राजकीय अस्थिरता आणि ढासळलेली व्यवस्था यामुळे या देशाचे कर्ज GDP च्या २२१.५ टक्क्यावर पोहचले आहे.
३. सिंगापूर

सिंगापूर तिसऱ्या क्रमांकावर असून त्याचे बहुतांश कर्ज दीर्घकालीन गुंतवणूक प्रकल्पांसाठी घेतले जाते. त्यामुळे त्याचे कर्ज GDP च्या १७५.६% इतके दिसते.
४. ग्रीस

२०१० च्या आर्थिक संकटानंतरही ग्रीसचा तणाव कमी झालेला नाही. खर्च आणि विकास यातील असंतुलनामुळे कर्ज १४७.७ % इतके आहे.
५. बहरीन

तेलाच्या कमी झालेल्या किंमतींनी बहरीन या देशाची अर्थव्यवस्था डळमळली असून आणि कर्ज GDP च्या १४२.५ % वर गेली आहे.
६.इटली

युरोपातील मोठी अर्थव्यवस्था असलेल्या इटलीसाठी आर्थिक वाढ थांबल्यासारखी झाली आहे. त्यामुळे कर्जाचे प्रमाण १३६. ८ % आहे.
७.
मालदीव

पर्यटनावर अवलंबून असलेल्या मालदीवमध्ये या क्षेत्रातील मंदी आणि विकास प्रकल्पांसाठी घेतलेली उधारी यामुळे कर्ज १३१.८% झाले.
८. अमेरिका

जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेवरही कर्जाचे सावट आहे. सरकारी खर्च आणि राजकीय धोरणांमुळे अमेरिकेचे कर्ज GDP च्या १२५ % पर्यंत पोहचले आहे.
९. सेनेगल
मोठे प्रकल्प आणि बाह्य उधारी यामुळे सेनेगलवर GDP च्या १२२.९% इतका कर्जभार आहे.
१०. फ्रान्स
आरोग्य, सामाजिक सुरक्षा आणि इतर योजनांवरील जादा खर्चामुळे फ्रान्सचे कर्ज GDP च्या ११६ % वर पोहचले आहे.
अवश्य वाचा: रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’चा मोठा धमाका; रिलीजपूर्वीच कोट्यवधींची कमाई



