Sharad Pawar Inspire Fellowship : श्रीनिवास एल्लाराम यांना ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप’ जाहीर

Sharad Pawar Inspire Fellowship : श्रीनिवास एल्लाराम यांना 'शरद पवार इन्स्पायर फेलोशिप' जाहीर

0
Sharad Pawar Inspire Fellowship : श्रीनिवास एल्लाराम यांना 'शरद पवार इन्स्पायर फेलोशिप' जाहीर
Sharad Pawar Inspire Fellowship : श्रीनिवास एल्लाराम यांना 'शरद पवार इन्स्पायर फेलोशिप' जाहीर

Sharad Pawar Inspire Fellowship : नगर : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे (Yashwantrao Chavan Foundation) देण्यात येणारी शिक्षण क्षेत्रातील प्रतिष्ठेची मानली जाणारी ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप २०२६’ (Sharad Pawar Inspire Fellowship) (शिक्षण विभाग) जाहीर करण्यात आली. यात पाथर्डी तालुक्यातील मांडवे जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक श्रीनिवास भुमराज एल्लाराम (Srinivas Bhumraj Ellaram) यांची निवड करण्यात आली.

अवश्य वाचा : शिर्डीत एका महिलेच्या नावे दुसऱ्याच व्यक्तीने केले मतदान

एल्लाराम हे महत्त्वपूर्ण विषयावर संशोधन करणार

यशवंतराव चव्हाण सेंटर आणि एमकेसीएल यांच्या संयुक्त विद्यमाने ही फेलोशिप दिली जाते. या फेलोशिपचे स्वरूप रोख रक्कम, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे आहे. निवड झालेले एल्लाराम हे आगामी शैक्षणिक वर्षात ‘जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे स्मार्ट मूल्यांकन’ या महत्त्वपूर्ण विषयावर संशोधन करणार आहेत.

Sharad Pawar Inspire Fellowship : श्रीनिवास एल्लाराम यांना 'शरद पवार इन्स्पायर फेलोशिप' जाहीर
Sharad Pawar Inspire Fellowship : श्रीनिवास एल्लाराम यांना ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप’ जाहीर

नक्की वाचा : जिल्ह्यात ४ डिसेंबरपर्यंत थंडीच्या लाटेची शक्यता; दक्षता घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

मान्यवरांच्या हस्ते वितरण (Sharad Pawar Inspire Fellowship)

या संशोधनाच्या कालावधीत एल्लाराम यांना राज्यातील तसेच देशातील नामवंत शिक्षण तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. विशेष म्हणजे देशाचे माजी संरक्षण मंत्री तथा ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि माजी शिक्षण संचालक डॉ. वसंत काळपांडे यांच्या प्रत्यक्ष भेटीचा आणि मार्गदर्शनाचा लाभ त्यांना होणार आहे. या फेलोशिपचे वितरण १४ डिसेंबर रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे मान्यवरांच्या हस्ते एका विशेष सोहळ्यात करण्यात येणार आहे.