Maharashtra Raj Bhavan: महाराष्ट्रातील राजभवनचे नाव बदलले, ‘लोकभवन’ म्हणून मिळाली नवी ओळख 

0
Maharashtra Lok Bhavan: महाराष्ट्रातील राजभवनचे नाव बदलले, 'लोकभवन' म्हणून मिळाली नवी ओळख
Maharashtra Lok Bhavan: महाराष्ट्रातील राजभवनचे नाव बदलले, 'लोकभवन' म्हणून मिळाली नवी ओळख

Maharashtra Raj Bhavan : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारकिर्दीत अनेक बदल देशाने पाहिले आहेत. त्यातच केंद्र सरकारच्या पंतप्रधान कार्यालयाचे (PMO) नाव बदलल्यानंतर आता महाराष्ट्रातील राजभवनचे नावही बदलण्यात आलं आहे. राज्याचे राजभवन (Maharashtra Raj Bhavan) आता लोकभवन (Lok Bhavan) या नवीन नावाने ओळखलं जाणार आहे. राज्य सरकारने या बाबतची अधिसूचना जारी केली आहे. त्याची तात्काळ अंमलबजावणी केली जाणार आहे.

नक्की वाचा: जगातील सर्वाधिक कर्जबाजारी देशात नंबर १ कोण ? वाचा सविस्तर…    

राजभवनच्या सचिवांच्या नावाने एक अधिसूचना जारी करण्यात आली असून त्यामध्ये राजभवनचे नाव लोकभवन असे करण्यात आल्याचा आदेश आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल या ठिकाणी वास्तव्य करतात.

सरकारने काढलेल्या आदेशात काय ? (Maharashtra Raj Bhavan)

राज्यातील राज्यापालांच्या आदेशाने आणि केंद्रीय गृहमंत्रालयाशी चर्चा केल्यानंतर राजभवनचे नाव बदलण्यात आले आहे. यापुढे राजभवन हे लोकभवन या नवीन नावाने ओळखलं जाईल असं या आदेशात म्हटलं आहे.

अवश्य वाचा:  रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’चा मोठा धमाका; रिलीजपूर्वीच कोट्यवधींची कमाई  

पंतप्रधान कार्यालयाचे नाव आता ‘सेवा तीर्थ’ (Maharashtra Raj Bhavan)

केंद्र सरकारने पंतप्रधान कार्यालयाचे नाव बदलून सेवा तीर्थ असे ठेवले आहे. लवकरच PMO नवीन कॉम्प्लेक्समध्ये स्थलांतरित होणार असून त्या इमारतीलाच ‘सेवा तीर्थ’ हे नाव देण्यात आले आहे. नव्या परिसराला आधी सेंट्रल व्हिस्टा रीडेव्हलपमेंट प्रोजेक्टअंतर्गत Executive Enclave म्हणून ओळखले जात होते.