Mallakhamb : नगर : अहिल्यानगर मल्लखांब (Mallakhamb) व योगा सेंटरची मल्लखांबपटू प्राची खळेकर (Prachi Khalekar) हिची खेलो इंडिया (Khelo India) स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जयपुर, राजस्थान येथे होणाऱ्या अंतर विद्यापीठ खेलो इंडिया मल्लखांब स्पर्धेसाठी प्राचीची निवड झाली आहे.
अवश्य वाचा : शिर्डीत एका महिलेच्या नावे दुसऱ्याच व्यक्तीने केले मतदान
जयपूर येथे होणाऱ्या स्पर्धेमध्ये निवड
यापूर्वी जानेवारी महिन्यात भोपाळ येथे झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ मल्लखांब स्पर्धेमध्ये प्राची विजय खळेकर हिने पुणे विद्यापीठाचे नेतृत्व करून द्वितीय क्रमांक मिळवला होता. त्यामुळे पुढे जयपूर येथे होणाऱ्या खेलो इंडिया मल्लखांब स्पर्धेमध्ये तिची निवड झाली आहे.
नक्की वाचा : जिल्ह्यात ४ डिसेंबरपर्यंत थंडीच्या लाटेची शक्यता; दक्षता घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
मल्लखांब व योगा खेळाडूनी केले अभिनंदन (Mallakhamb)
तसेच नुकत्याच चेन्नई येथे झालेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ मल्लखांब स्पर्धेमध्येही प्राचीने सलग दुसऱ्या वर्षी द्वितीय क्रमांक पटकावला. प्राची खळेकरला संस्थेचे मुख्य प्रशिक्षक अनिकेत सुसरे व प्रशिक्षिका प्राजक्ता दळवी यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या यश याबद्दल अहिल्यानगर मल्लखांब व योगा सेंटरचे खेळाडू व पालकांनी तिला शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.



