EVM : नगर : जिल्ह्यातील आठ नगरपालिकांच्या निवडणुकांनंतर ईव्हीएम (EVM) मशिन ची काटेकोर सुरक्षितता राखण्यासाठी प्रशासनाने प्रत्येक स्ट्राँग रूमभोवती (Strong Room) दोन स्तरांमध्ये सुरक्षा यंत्रणा तैनात केली आहे. ही सुरक्षा मतमोजणीपर्यंत (Vote Counting) कायम राहणार आहे.
नक्की वाचा : बसमध्ये चोऱ्या करणारी रिलस्टार कोमल आहे खोक्याची भाची
रात्री उशीरीपर्यंत सुरू होते मतदान
श्रीरामपूर, संगमनेर, राहाता, राहुरी, शिर्डी, शेवगाव, श्रीगोंदा व जामखेड या आठ नगरपालिकांमध्ये (ता. २) रोजी मतदान शांततेत पार पडले. अनेक ठिकाणी सायंकाळनंतरही रांगा कायम असल्याने मतदान रात्रीपर्यंत सुरू होते. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस अधिकारी आणि उमेदवार प्रतिनिधींच्या उपस्थितीत सर्व ईव्हीएम मशीन सीलबंद करण्यात आले. रात्रीच स्ट्राँग रूम मध्ये हलवून ठेवण्यात आले. प्रशासनाने निश्चित केलेल्या मतमोजणी केंद्रांच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या स्ट्राँग रूम्सभोवती २४ तास कठोर पहारा ठेवला आहे.
अवश्य वाचा : जगातील सर्वाधिक कर्जबाजारी देशात नंबर १ कोण ? वाचा सविस्तर…
येथे बनविण्यात आले स्ट्राँग रूम (EVM)
जामखेड श्री नागेश्वर सामाजिक सभागृह, शिर्डी- श्री साईबाबा आयटीआय कॉलेज, संगमनेर-सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात क्रिडा संकुल, राहुरी-लोकनेते कै. रामदास पाटील धुमाळ महाविद्यालय, श्रीगोंदा- शासकीय धान्य गोडावून, पेडगाव रस्ता, शेवगाव- तहसील कार्यालय, राहाता – राहाता नगरपालिका प्रशासकीय इमारत, श्रीरामपूर-नवीन प्रशासकीय तहसिल कार्यालय येथे स्ट्राँग रूम बनविण्यात आले आहे.



