Divyang : नगर : दिव्यांग (Divyang) व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणणे हे आपणा सर्वांचे प्रथम कर्तव्य आहे. प्रशासन दिव्यांगांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांमध्ये सर्वतोपरी सहकार्य करत आहे. यावेळी त्यांनी दिव्यांगांसाठी उपलब्ध योजनांचा आढावा घेऊन त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे (Zilla Parishad) मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी (Anand Bhandari) यांनी दिल्या.
नक्की वाचा : बसमध्ये चोऱ्या करणारी रिलस्टार कोमल आहे खोक्याची भाची
विविध संस्थांचा सहभाग
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, अहिल्यानगर, जानकीबाई आपटे मूकबधिर विद्यालय (अहिल्यानगर), अपंग संजीवनी मूकबधिर विद्यालय (सावेडी), मतिमंद शाळा (अहिल्यानगर), ज्योत्स्ना उद्योग केंद्र (अहिल्यानगर), राष्ट्रसंत आनंदऋषीजी दिव्यांग शाळा (नेप्ती), मतिमंद विद्यालय (नेप्ती) तसेच मतिमंद विद्यालय (तपोवन रोड) यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभात फेरी काढण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
अवश्य वाचा : जगातील सर्वाधिक कर्जबाजारी देशात नंबर १ कोण ? वाचा सविस्तर…
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन (Divyang)
यावेळी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी देविदास कोकाटे, संस्थेच्या अध्यक्षा डॉ. विद्या जोशी, शिक्षण अधिकारी भास्कर पाटील, डी. डी. आर. सी. विळद घाटचे डॉ. दीपक अनाप, महापालिका प्रशासन अधिकारी जुबेर पठाण, ॲड. लक्ष्मण पोकळे, राजेंद्र पोकळे, आनंद कडूस आदी उपस्थित होते.प्रभातफेरीतील दिव्यांगांनी छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
टिळकरोड, माळीवाडा भागातून या रॅलीचे मार्गक्रमण झाले. या रॅलीत दिव्यांग विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, उत्साह झळकणारी ऊर्जा पाहणाऱ्यांना भावणारी ठरली. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, १०० मीटर व २०० मीटर धावण्याच्या स्पर्धा तसेच कर्णबधिर, अस्थिव्यंग आणि मतिमंद प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विविध खेळ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये उत्साहाने भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.



