नगर : रोलेक्स (Rolex) हे फक्त हातात परिधान करण्याचे घड्याळ नाही, तर ते यशस्वी आणि प्रतिष्ठित व्यक्तींची ओळख आहे. आजच्या काळात रोलेक्सच्या घड्याळांना असलेली मागणी, त्याची किंमत (Rolex Cost) पाहून आपल्याला आश्चर्य वाटते. मात्र रोलेक्सच्या घडाळ्यांना जगभरात एवढी मागणी (Rolex Demand) का आहे? हे सविस्तर जाणून घेऊयात..
कंपनीचा इतिहास काय ? (Rolex Cost)
१९०५ मध्ये हॅन्स विल्सडॉर्फ यांनी ही कंपनी सुरू केली, तेव्हा रिस्ट वॉच म्हणजेच हातातील घड्याळ हे अचूक मानले जात नव्हते. मग कंपनीने पॉकेट वॉच पेक्षा अधिक अचूक टाइम दाखवणारी रिस्ट वॉच बनवण्यावर लक्ष केंद्रित केले. अनेक प्रयोग करून त्यांनी जगातल्या सर्वात ‘अचूक’ रिस्ट वॉच चा पाया रचला. १९१९ मध्ये रोलेक्स कंपनीचे मुख्य कार्यालय स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे हलवण्यात आले.

त्या काळात ‘स्विस मेड’ घड्याळे ही जगभरात सर्वोत्तम अचूकतेसाठी ओळखली जात होती. रोलेक्सच्या घड्याळांवर ‘स्विस मेड’ टॅग लागल्यामुळे त्याची ब्रँड व्हॅल्यू खूप वाढली आणि विक्रीत कंपनीला मोठा फायदा झाला. रोलेक्स कंपनीची सुरुवात ‘विल्सडॉर्फ अँड डेविस’ या नावाने झाली होती. मात्र हे नाव घड्याळाच्या डायलवर लिहिण्यासाठी खूप मोठे होते. त्यामुळे, ब्रँड पटकन ओळखला जावा, या विचाराने १९०८ मध्ये कंपनीचे नाव बदलून आकर्षक आणि छोटे म्हणजेच ‘रोलेक्स’ असे ठेवण्यात आले.
नक्की वाचा : तलाठ्याच्या सही-शिक्क्याची गरज संपली; डिजिटल सातबाऱ्याला कायदेशीर मान्यता
१९२६ मध्ये रोलेक्सने जगातील पहिले वॉटरप्रूफ घड्याळ तयार केले. या शोधानंतर रोलेक्सने घड्याळांची अचूकता तसेच बाहेरच्या वातावरणातील घटक जसे की, पाणी आणि धूळ यांपासून घड्याळ त्यांचं घड्याळ सुरक्षित केले. यामुळे ‘ऑयस्टर’ या नावाचे त्यांचं हे घड्याळ जगभर प्रसिद्ध झाले. रोलेक्सचे संस्थापक हॅन्स विल्सडॉर्फ यांनी पारंपरिक जाहिरातबाजी टाळून इव्हेंट मार्केटिंगचा अनोखा मार्ग निवडला. पाण्यातील चाचणीसाठी त्यांनी जलतरणपटू मर्सिडीज ग्लीट्जला ते वॉटरप्रूफ घड्याळ घालायला सांगितले. अशा प्रकारे, प्रत्यक्ष कृतीतून उत्पादन सिद्ध करून कंपनीने स्वतःची विश्वासार्हता वाढवली.
अवश्य वाचा: साधू-संतांना तरी झाडं तोडलेलं पटेल का? वृक्षतोडीवरून सयाजी शिंदेंचा सवाल
रोलेक्स घड्याळे महाग का असतात ? (Rolex Cost)
रोलेक्स घड्याळे ही सामान्य घड्याळांपेक्षा वेगळी असतात, कारण त्यामध्ये अत्यंत महागडे स्टील, सोने आणि प्लॅटिनम यांसारखे मौल्यवान धातू वापरले जातात. उच्च दर्जाच्या सामग्रीमुळे त्यांची किंमत ही नेहमी लाखोंच्या घरात असते. समुद्राच्या खोलवर किंवा पर्वतांच्या उंच शिखरांवरही रोलेक्सची घड्याळे अचूक वेळ सांगतात. त्यांचे उच्च दर्जाचे मटेरियल, मजबूत रचना आणि अत्यंत कमी देखभाल यामुळे ती इतर घड्याळांपेक्षा जास्त टिकाऊ ठरतात. याच कारणामुळे ओरिजनल रोलेक्स घड्याळ खरेदी करण्यासाठी तुम्हाला ४ ते ५ वर्षांपर्यंत वाट पाहावी लागते.



