Devendra Fadnavis: मराठी माणूस पंतप्रधान होण्याच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

0
Devendra Fadnavis: मराठी माणूस पंतप्रधान होण्याच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Devendra Fadnavis: मराठी माणूस पंतप्रधान होण्याच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

नगर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असून आज मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या तिसऱ्या टर्ममधील कामकाजाला एक वर्ष झालं आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केलेल्या वक्तव्यावर त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

नक्की वाचा: ‘बाई अडलीये म्हणूनच ती नडलीये’ टॅगलाईन जीवंत करणारा ‘आशा’चा ट्रेलर प्रदर्शित

पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले ? (Devendra Fadnavis)

काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अमेरिकेचा दाखल देत लवकरच देशाच्या पंतप्रधानपदी मराठी माणूस विराजमान होईल,असे त्यांनी म्हटले होते. आता, खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली असून २०२९ ला देखील मोदीच पंतप्रधान असतील,असे त्यांनी म्हटले.

अवश्य वाचा: ‘रोलेक्स’च्या घडाळ्यांना जगभरात इतकी मागणी का? वाचा सविस्तर…   

मोदीचं आरोग्य उत्तम,४० वर्षाच्या व्यक्तीलाही लाजवेल (Devendra Fadnavis)

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पृथ्वीराज बाबांना अशी स्वप्न पडत असतात, एक लक्षात ठेवा आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अतिशय उत्तम काम करत आहेत. देशांमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड प्रेम आहे. ज्या पद्धतीने ते देशाला पुढे नेत आहेत, असे कोणीही करू शकत नाही. मोदींचे आरोग्य उत्तम आहे, ४० वर्षाच्या व्यक्तीला लाजवेल अशा प्रकारचे आहे. त्यामुळे, २०२९ ला देखील मोदीजीच पंतप्रधान असतील हे आपण लक्षात ठेवले पाहिजे,अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.