Local Crime Branch : नगर : संगमनेर तालुक्यात वृद्ध महिलांच्या गळ्यातील दागिने बळजबरीने चोरी करणारे दोघे संशयित स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने ताब्यात घेतले आहे. दोघे ही सराईत गुन्हेगार (Criminal) असून त्यांच्या विरोधात बारामती, निगडी, भोर, पुणे, पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल असल्याचे पोलीस (Police) तपासात समोर आले आहे.
नक्की वाचा : शिक्षिका धर्मांतराबाबतचे धडे देत असल्याचा आरोप; पोलीस अधीक्षकांना निवेदन
ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे
अनिल रघुनाथ बिरदवडे (वय – ३७,रा. बांदलवाडी, गुणवाडी ता. बारामती जि.पुणे), व सोनार ऋषिकेश योगेश ढाळे (वय -२२, रा. तांदुळवाडी, वेस, बारामती जि.पुणे) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याचा साथीदार अशोक विश्वनाथ गंगावणे (रा. विठ्ठलवाडी ता. बारामती जि.पुणे) (पसार), तसेच सोनार यश योगेश ढाळे (रा. तांदुळवाडी, वेस, बारामती, जि. पुणे (फरार) यांना दिले असल्याचे तपास समोर आले.
अवश्य वाचा : महापालिकेच्या मतदार यादीत श्रीगोंद्याची चार हजार नावे; अभिषेक कळमकरांचे आयुक्तांना निवेदन
पुढील तपासासाठी संगमनेर पोलिसांच्या ताब्यात (Local Crime Branch)
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या संगमनेर शहर पोलीस ठाणे हद्दीत वृद्ध महिलेच्या गळ्यातील दागिने चोरणारी टोळी ही बारामतीत येत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. दोन्ही संशयित आरोपींना पुढील तपासासाठी संगमनेर शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग पोलीस अंमलदार संतोष खैरे, लक्ष्मण खोकले, गणेश लोंढे, फुरकान शेख, भिमराज खर्से, राहुल डोके, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ, योगेश कर्डिले, प्रशांत राठोड, चालक अरुण मोरे यांच्या पथकाने केली.



