Kisan Sabha : अकोले : शेतकर्यांचे संपूर्ण कर्ज 30 जून, 2026 च्या आत माफ करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले आहे. कर्जमाफी केवळ थकीत कर्जदारांची होते हा अनुभव आहे. राज्यात सध्या ऊस गळीत हंगाम सुरू आहे. उसाला पहिली उचल व भाव मिळावा, यासाठी किसान सभा (Kisan Sabha) व ऊस उत्पादक शेतकरी (Sugarcane Farmers) संघर्ष समितीच्यावतीने राज्यभर आंदोलने सुरू आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांनी या पार्श्वभूमीवर शेतकर्यांचे कर्ज परस्पर ऊस पेमेंटमधून किंवा पहिल्या हप्त्यातून कापून घेऊ नये, असे आवाहन केले आहे.
नक्की वाचा : शिक्षिका धर्मांतराबाबतचे धडे देत असल्याचा आरोप; पोलीस अधीक्षकांना निवेदन
लवकरच पहिली उचल खात्यावर वर्ग हाेणार
किसान सभा व ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या आंदोलनाचा परिणाम म्हणून लवकरच पहिली उचल शेतकर्यांच्या खात्यावर वर्ग होईल. मात्र असे होताना बर्याचदा सहकारी बँका कारखान्यांना संपर्क करून शेतकर्यांचे कर्ज ऊसाच्या पहिल्या हप्त्यामधून किंवा पेमेंटमधून वसूल करून घेतात. परिणामी असे शेतकरी थकीत कर्जदार न राहता नियमित कर्जदार बनतात व कर्जमाफीच्या योजनेतून वगळले जातात. त्यामुळे साखर कारखान्यांनी शेतकर्यांचे कर्ज परस्पर ऊस पेमेंटमधून किंवा पहिल्या हप्त्यातून कापून घेऊ नये असे आवाहन केले आहे.
अवश्य वाचा : महापालिकेच्या मतदार यादीत श्रीगोंद्याची चार हजार नावे; अभिषेक कळमकरांचे आयुक्तांना निवेदन
अन्यथा कर्जाची जबाबदारी कारखान्यांनी घ्यावी (Kisan Sabha)
शेतकर्यांचे कर्ज परस्पर ऊस पेमेंटमधून कारखान्यांनी बँकांना वळते करून दिल्यास व त्यामुळे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिल्यास शेतकर्यांच्या कर्जाची संपूर्ण जबाबदारी कारखान्यांना घ्यावी लागेल, असा इशारा किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी दिला आहे.



