नगर: टीम इंडिया केएल राहुल याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील (IND vs SA) हा सामना आज शनिवारी 6 डिसेंबरला विशाखापट्टणममध्ये आयोजित करण्यात आला आहे. ही 3 सामन्यांची मालिका आतापर्यंत 1-1 ने बरोबरीत आहे. दक्षिण आफ्रिका या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर होती. भारताने रांचीत विजयी सुरुवात करत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली होती. मात्र दक्षिण आफ्रिकेने भारताचा रायपूरमध्ये हिशोब केला आणि मालिका बरोबरीत आणली. आता अंतिम सामन्यासह मालिका कोण जिंकणार ? याकडे सगळ्यांचं लक्ष असताना भारतीय चाहत्यांचं लक्ष मात्र आज विराट कोहली (Virat Kohli) याच्या कामगिरीकडे असेल. ते का हेच आज जाणून घेऊया..
नक्की वाचा : ‘रोलेक्स’च्या घडाळ्यांना जगभरात इतकी मागणी का? वाचा सविस्तर…
विराट कोहलीची कारकीर्द ? (Virat Kohli)

भारताचे रनमशीन म्हणून ओळख असलेल्या विराट कोहलीने या मालिकेतील पहिल्या २ सामन्यात धमाका केला. विराटने सलग दोन्ही सामन्यात शतक झळकावलं. त्यामुळे विराट या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. या सलग 2 शतकांसह रायपूरमध्ये अनेक विक्रम त्याने आपल्या नावावर केले. त्यानंतर आता विराटला अंतिम सामन्यात ३ विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी आहे.आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात एकूण 12 फलंदाजांनी सलग 3 शतकं झळकावली आहेत. या 12 फलंदाजांमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचाही समावेश आहे. तर पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज बाबर आझम याने 2 वेळा सलग 3 शतकं करण्याची कामगिरी केली आहे. त्यामुळे विराटकडे सलग दुसऱ्यांदा 3 शतकं लगावून बाबर आझम याच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी करण्याची संधी आहे.
अवश्य वाचा: ‘बाई अडलीये म्हणूनच ती नडलीये’ टॅगलाईन जीवंत करणारा ‘आशा’चा ट्रेलर प्रदर्शित
कोहली रचणार का इतिहास ? (Virat Kohli)
विराटने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेत खेळला होता. विराटने तेव्हाही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक केलं होतं. त्यामुळे विराटकडे विशाखापट्टणममध्ये शतक करुन दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चौकार लगावण्यात संधी आहे. विराटने असं केल्यास तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग 4 शतकं झळकावणारा पहिला फलंदाज ठरेल. विराटने लागोपाठ शतकं झळकावण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी 2018मध्ये वेस्ट इंडिजविरूद्ध खेळतानाही त्याने लागोपाठ 3 शतकं झळकावली होती. यावेळी त्याचा फॉर्म पाहता तो पुन्हा एकदा सलग तिसरं शतक झळकावेल अशी दाट शक्यता आहे. असं झाल्यास तो वनडे क्रिकेटमध्ये 2 वेळा सलग 3 शतकं झळकावणारा पहिलाच भारतीय फलंदाज ठरू शकतो.



