Dnyaneshwar Bandagar Maharaj : ग्रामीण संस्कृती वारकऱ्यांनी टिकवली : ज्ञानेश्वर बंडगर महाराज

Dnyaneshwar Bandagar Maharaj : ग्रामीण संस्कृती वारकऱ्यांनी टिकवली : ज्ञानेश्वर बंडगर महाराज

0
Dnyaneshwar Bandagar Maharaj : ग्रामीण संस्कृती वारकऱ्यांनी टिकवली : ज्ञानेश्वर बंडगर महाराज
Dnyaneshwar Bandagar Maharaj : ग्रामीण संस्कृती वारकऱ्यांनी टिकवली : ज्ञानेश्वर बंडगर महाराज

Dnyaneshwar Bandagar Maharaj : नगर : अहिल्यानगर जिल्ह्याला संत परंपरेचा आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. ती परंपरा जोपासण्याचे आणि दिवसेंदिवस समृद्ध करण्याचे काम ग्रामीण भागातील वारकऱ्यांनी (Varkari) केले आहे, असे मत संत साहित्याचे (Saint Literature) अभ्यासक ज्ञानेश्वर बंडगर महाराज (Dnyaneshwar Bandagar Maharaj) यांनी व्यक्त केले.

नक्की वाचा : टीईटी सक्ती रद्द करा; शिक्षक संघटनांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

वारकऱ्यांचा ग्रंथसंपदा व सन्मानचिन्ह देऊन गौरव

सद्गुरु श्री साहेबराव आवारे प्रतिष्ठानतर्फे वारकऱ्यांचा ग्रंथसंपदा व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सिद्धिनाथ मेटे महाराज, प्रसिद्ध कवी प्रा. शशिकांत शिंदे, डॉ. संजय बोरुडे, अशोक निंबाळकर, ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे, सद्गुरु श्री साहेबराव आवारे प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप शेटे, सचिव नवनाथ मगर, ॲड. विनायक तोडमल, प्रवीण पवार, साहित्यिक सचिन चोभे, यासह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अवश्य वाचा : गावठी कट्टा बाळगणारे दोघे जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

बंडगर महाराज म्हणाले की, (Dnyaneshwar Bandagar Maharaj)

‘संताची शिकवण ही आपल्या जगण्याचा भाग बनविणे गरजेचे आहे. संत विचारांचे आचरण करणाऱ्या वारकऱ्यांचा सन्मान करणे, ही आपली नैतिक जबाबदारी आहे. या कर्तव्य भावनेतूनच प्रतिष्ठानच्या माध्यमातून ‘वारकरी सन्मान’ करण्यात आला ही अभिमानाची बाब आहे. अशा उपक्रमांमुळे समाजाला निश्चितपणे योग्य दिशा मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

सद्गुरू श्री साहेबराव आवारे प्रतिष्ठानच्या माध्यमातून जेऊर आणि परिसरातील वारकऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. मच्छिंद्र तवले, रघुनाथ तोडमल, सुदाम दारकुंडे, रमेश चौधरी, चांगदेव आठरे, शरद तवले महाराज, दत्तात्रय खांदवे महाराज आदी वारकऱ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सूर्यकांत वरकड यांनी तर नवनाथ मगर यांनी आभार मानले.