Sangram Jagtap : मंदिर व शिवालय हे आपल्या हिंदू धर्माचे शक्तिस्थान, प्रेरणास्थान : आमदार संग्राम जगताप

Sangram Jagtap : मंदिर व शिवालय हे आपल्या हिंदू धर्माचे शक्तिस्थान, प्रेरणास्थान : आमदार संग्राम जगताप

0
Sangram Jagtap : मंदिर व शिवालय हे आपल्या हिंदू धर्माचे शक्तिस्थान, प्रेरणास्थान : आमदार संग्राम जगताप
Sangram Jagtap : मंदिर व शिवालय हे आपल्या हिंदू धर्माचे शक्तिस्थान, प्रेरणास्थान : आमदार संग्राम जगताप

Sangram Jagtap : नगर : मंदिर व शिवालय (Shivalaya) हे आपल्या हिंदू धर्माचे (Hinduism) शक्तिस्थान व प्रेरणास्थान आहेत. भगवंताच्या भक्तीने व कृपाशीर्वादाने सर्व नागरिकांचे भले होत असते. नंदनवननगर मधील नागरिकांनी आपली हिंदू परंपरा जपत मोठ्या उत्साहाने रामेश्वर शिवलिंग प्राणप्रतिष्ठापना सोहळा व भव्य शोभायात्रेमुळे या भागात भक्तिमय वातवरण निर्माण झाले आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी केले.

नक्की वाचा : टीईटी सक्ती रद्द करा; शिक्षक संघटनांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित

पाईपलाईन रस्त्यावरील नंदनवननगर येथे विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात होणाऱ्या रामेश्वर महादेवाच्या शिवलिंग प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त पाईपलाईन रोडवरून शुक्रवारी (ता. ६) भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, शिवाजी चव्हाण, विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे दीपक दहे, सचिन पवार, नवनाथ एकशिंगे, मनोज लाटे, बाबासाहेब गिरगुणे, सतीश कावरे, चाळक महाराज, चव्हाण महाराज, सुमन शेंडे, मनीषा देहे, अश्विनी पवार, मनीषा एकशिंगे, माजी नगरसेविका रूपाली बारस्कर व मीना चव्हाण, किरण बारस्कर आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अवश्य वाचा : गावठी कट्टा बाळगणारे दोघे जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

बाल वारकरी पथक शोभायात्रेचे विशेष आकर्षण (Sangram Jagtap)

शोभायात्रेतील रथात भगवान शंकराची प्रतिमा तसेच मंदिराचा कळस ठेवण्यात आला होता. शोभायात्रेत परिसरातील महिला मंगलकलश व तुळशी वृंदावन घेऊन सहभागी झाल्या होत्या, तर पुरुषांनी भगवे झेंडे हातात घेत भगव्या टोप्या परिधान करून उत्साहात सहभाग नोंदवला. ढोल पथक, झांज पथक आणि बाल वारकरींचे पथक शोभायात्रेचे विशेष आकर्षण ठरले. वाजतगाजत भक्तिपूर्ण वातावरणात निघालेल्या या शोभायात्रेचे भिस्तबाग चौकात आमदार संग्राम जगताप यांनी स्वागत केले. यावेळी आमदार जगताप यांना रथात बसवून, तीन जेसीबी मधून रथावर आणि शोभायात्रेवर भव्य पुष्पवृष्टी करण्यात आली. उपस्थित नागरिकांनी या वेळी जोरदार घोषणा देत वातावरण भक्तिमय केले.

नंदनवननगरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे अध्यक्ष कारभारी शेंडे म्हणाले, मंदिरात होणाऱ्या रामेश्वर महादेव पिंडीच्या प्राणप्रतिष्ठा निमित्त ८ डिसेंबर दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी ५ डिसेंबर रोजी सायंकाळी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज समाधी स्थान कोपरगावचे गुरुवर्य महंत रामेशगिरी महाराज यांच्या शुभहस्ते रामेश्वर महादेव पिंडीची विधिवत प्राणप्रतिष्ठा व मंदिरावर कलशारोहण करण्यात आले. ८ डिसेंबर रोजी गोदावरी धाम सरलाबेटचे महंत रामगिरी महाराज यांचे ५ ते ७ या वेळेत काल्याचे कीर्तन होणार आहे. यानिमित्त दररोज विद्यावाचस्पती आचार्य शुभम कांडेकर महाराज यांच्या शिवपुराण कथेचे व महाप्रसादाचे योजन करण्यात आले आहे.