Devendra Fadnavis : नगर : भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने दादर चैत्यभूमी येथे महाराष्ट्र, गुजरात राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह अन्य मंत्र्यांच्या उपस्थितीत शासकीय अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील इंदूमिल स्मारकाचा मुद्दा चर्चेचा ठरला. इंदुमिल स्मारकाबाबत अनेकांचे आक्षेप असल्याचे नरेंद्र जाधव यांनी सर्वांसमक्ष मुख्यमंत्र्यांना सांगितले. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील वर्षी पर्यंत स्मारक स्मारकाचे काम पूर्ण करण्याचे सरकारचे लक्ष असल्याचे सांगितले.

दादर मेट्रो स्टेशनला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याची मागणी
प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी इंदुमिल स्मारकातील बाबासाहेबांच्या पुतळ्यावर काही लोकांकडून आक्षेप घेण्यात आले आहेत. यावर एक समन्वय समिती नेमूम हा प्रश्न मार्गी लावणं गरजेच आहे. सोबतच दादर मेट्रो स्टेशनला चैत्यभूमी मेट्रो स्टेशन अस नाव देण्यात यावं अशी मागणी देखील नरेंद्र जाधव यांनी केली. यावर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “बाबासाहेबांचे जीवन आणि त्यांचे विचार म्हणजे धगधगता अंगार होता. बाबासाहेबांचे जीवन म्हणजे ज्ञानाच्या बळावर अन्यायाविरुद्ध केलेला संघर्ष होता. ज्या समाजाने त्यांना पाणी नाकारलं त्याच समाजात त्यांनी शिक्षणाच्या मदतीने संघर्ष केला. त्यांनी ज्ञानसाधना केली आणि जगातील सर्वश्रेष्ठ विद्वानांच्या पंक्तीत आपले स्थान निर्माण केलं.”
नक्की वाचा : टीईटी सक्ती रद्द करा; शिक्षक संघटनांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
पुढे बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की,
“न्याय, स्वातंत्र्य समता आणि बंधुता या चार स्तंभावर उभी असलेली भारताच्या लोकशाहीची पायाभरणी बाबासाहेबांनी केली. आपण कल्पना करा ज्या व्यक्तीला जीवनात इतके अन्याय सोसावे लागले त्या व्यक्तीने या राष्ट्रासाठी संविधान लिहिलं तेव्हा त्यात बदल्याची भावना नव्हती. द्वेष नव्हता. मत्सर नव्हता. प्रत्येक भारतीयाला सन्मानाने जगण्याचा हक्क देण्याची उदात्त भावना त्यांच्या मनामध्ये होती. अशा महामानवाच्या स्मृतीत बांधल जाणारं इंदुमिल स्मारक देशच भूषण ठरेल. सर्व मिळून समता प्रस्थापित करू.” असे शिंदे यांनी म्हटले.

अवश्य वाचा : गावठी कट्टा बाळगणारे दोघे जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, (Devendra Fadnavis)
“या देशाला संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गावर चालण्याची पुन्हा एकदा प्रेरणा प्राप्त करण्याकरता आपण सर्व लोक या ठिकाणी एकत्रित आलो आहोत. आपल्या देशामध्ये, आपल्या समाजामध्ये प्रचंड मोठी विषमता तयार झाली होती. या विषमतेने आपल्याच समाजातील अनेक लोकांचा मानव म्हणून जगण्याचा अधिकार हिरावून घेतला होता. अशा परिस्थितीमध्ये समाजामध्ये मोठी जागृती आणून एक समता युक्त समाज तयार झाला पाहिजे या भावनेतून या विषमतेलाच आपली शक्ती म्हणून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्ञान संपादित केलं.”

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, “बाबासाहेबांनी ज्ञानाच्या आधारावर समाजामध्ये समतेचे रोपण केलं. समाज जागृत केला आणि एक असं संविधान आपल्याला दिलं ज्या संविधानाने आपल्या देशामध्ये समतेचे राज्य तयार केलं. समाजामध्ये बंधुता निर्माण केली. या संविधानामुळेच आज आपला देश इतकी प्रगती करू शकला. आज आपण जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालो. लवकरच तिसरी अर्थव्यवस्था देखील होऊ. पण, याची मुहूर्तमेड, तिचा पायवा हा जर कोणी तयार केला असेल तर तो संविधानकार आणि अर्थतज्ञ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला. नुकतेच माझ्याकडे न्यू जर्सीचे गव्हर्नर आले होते. त्यांनी एक गोष्ट सांगितली आमच्याकडे एक चूक आम्ही केली. ती म्हणजे आज न्यूयॉर्कच्या भागांमध्ये विजेची कमतरता आहे. त्यांनी सांगितलं आमच्याकडे नॅशनल ग्रीड नसल्याने अमेरिकेसारख्या देशात विजेची कमतरता आहे.”
“त्याच वेळी मला हे लक्षात आलं की, बाबासाहेब वीज मंत्री म्हणून बाबासाहेबांनी ज्यावेळेस देशामध्ये पदभार स्वीकारला तेव्हा त्यांनी निर्णय घेतला की, संपूर्ण भारतामध्ये एक राष्ट्रीय ग्रीड तयार करायची. भारताच्या कुठल्याही भागात आपल्याला वीज नेता आली पाहिजे. आज आपण पाहतोय या नॅशनल ग्रेडमुळे भारताच्या कामाकोपऱ्यामध्ये आपण वीज पोचवू शकलो. अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्राला जे लक्षात आलं नाही ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लक्षात घेऊन आज भारताला स्वयंपूर्णतेकडे नेण्याचा कार्यक्रम त्यांनी आपल्याला दिला. अशा या महापुरुषाचे पुढच्या महापरिनिर्वाण दिनाच्यापूर्वी शक्यतोवर आपल्या इंदुमिलचे जे स्मारक आहे ते स्मारक पूर्ण व्हावं अशा प्रकारचा प्रयत्न आपण करत आहोत.” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.



