MPSC Exam Postponed:मोठी बातमी! MPSC ने २१ डिसेंबरची पूर्व परीक्षा पुढे ढकलली

0
MPSC Exam Postponed:मोठी बातमी! MPSC ने २१ डिसेंबरची पूर्व परीक्षा पुढे ढकलली
MPSC Exam Postponed:मोठी बातमी! MPSC ने २१ डिसेंबरची पूर्व परीक्षा पुढे ढकलली

MPSC Exam Postponed : राज्यातील २४६  नगरपालिका आणि ४८ नगरपंचायत निवडणुकीच्या (Nagarpanchayt Election) मतमोजणीमुळे २१ डिसेंबरला होणारी एमपीएससी पूर्व परीक्षा (MPSC Pre Exam) पुढे ढकलण्यात (Postponed) आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) सर्वच जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार,नव्याने परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

नक्की वाचा: सक्षम ताटे हत्या प्रकरणात मोठा खुलासा,मामिडवार कुटुंबाची धर्मांतराची ऑफर  

आता परीक्षा ‘या’ तारखेला होणार (MPSC Exam Postponed) 

४ जानेवारी आणि ११ जानेवारी २०२६ रोजी या परीक्षा होणार आहे. महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ अनुक्रमे ४ जानेवारी आणि ११ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे,अशी माहिती आयोगाने दिली. त्यामुळे, परीक्षार्थी, उमेदवारांनी याची दखल घ्यायला हवी. याआधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ च्या परीक्षेचे आयोजन २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत करण्यात आले होते. मात्र आता ही परीक्षा पुढे ढकलण्यात येणार आहे.

अवश्य वाचा: आता घरी गेल्यावर बॉसचा फोन उचलणं बंधनकारक नाही,राईट टू डिस्कनेक्ट विधेयक काय ?  

राज्यातील नगर परिषद व नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका २०२४ कार्यक्रमांतर्गत राज्य निवडणूक आयोगाच्या २ डिसेंबर २०२५ रोजीच्या आदेशानुसार मतमोजणी २१ डिसेंबरला करण्याबाबत सर्व जिल्हाधिकारी यांना निर्देशित केले आहे. आयोगामार्फत आयोजित परीक्षा व मतमोजणी एकाच दिवशी म्हणजेच २१ डिसेंबरला असल्याने त्यासंदर्भात काही मुद्द्यांच्या अनुषंगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांकडून माहिती मागविण्यात आली होती. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून आलेली माहिती आणि निकालाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

परीक्षा पुढे ढकलण्याचे कारण काय ? (MPSC Exam Postponed) 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून मागविलेल्या माहितीनुसार, काही जिल्हा केंद्रावरील परीक्षा उपकेंद्र व मतमोजणीचे ठिकाण यामधील कमी अंतर, लाऊडस्पीकरचा आवाज, वाहतूक कोंडी, परीक्षेदरम्यान निघणाऱ्या विजयी उमेदवारांच्या मिरवणुका, तसेच परीक्षेच्या आयोजनाकरीता कर्मचाऱ्यांची कमतरता इत्यादी बाबी विचारात घेवून त्यांनी परीक्षा आयोजित करण्यास अडचणी उद्भवू शकतात असे कळविले आहे. वस्तुस्थिती विचारात घेता ही परीक्षा नियोजित तारखेला न घेता पढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे आयोगाने परिपत्रकाद्वारे कळवले आहे.