RPI : कर्जत : अनेक वर्षांपासून कर्जत शहरात राहत असताना पक्की घरे असून त्याची भूमी अभिलेख कार्यालयास (Land Records Office) कसलीही नोंद नाही. नोंदीसाठी वारंवार कार्यालयाकडे पाठपुरावा करून देखील आजमितीस त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने सोमवारी (ता.८) आरपीआय (RPI) कर्जतच्यावतीने भजन, कीर्तन, जलसा तसेच डफडे बजाव आंदोलन करून आमरण उपोषण (Fasting To The Death) सुरू आहे.
अवश्य वाचा: जिल्हा प्रशासन व महापालिका सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली; अभिषेक कळमकर यांचा आरोप
भूमी अभिलेख विभागाकडे रीतसर मागणी
यावेळी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अक्षय जायभाये, माजी नगरसेवक सचिन घुले, उपनगराध्यक्ष संतोष मेहेत्रे यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली.मागील अनेक वर्षांपासून कर्जत शहरातील अक्काबाईनगर, सिध्दार्थनगर, राजीव गांधीनगर, लहुजीनगर, अण्णाभाऊ साठेनगर या भागात सर्वसामान्य नागरीक कुटुंबासह पक्क्या घरात वास्तव्य करीत आहे. याबाबत नागरिक घरांच्या नोंदीसाठी कर्जत नगरपंचायत यासह सिटीसर्व्हे भूमी अभिलेख विभागाकडे रीतसर मागणी करीत आहे.

नक्की वाचा : नगरच्या रेल्वे प्रकल्पांना गती द्या; खासदार नीलेश लंके यांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र
प्रशासन डोळेझाक करीत असल्याची भावना (RPI)
घराच्या नोंदीसाठी संबंधित विभागाकडे आवश्यक मोजणी करावी यासाठी पाठपुरावा केला. मात्र आजतागायत घरांच्या नोंदणीसाठी कोणतीच पाहणी अथवा मोजणी झाली नाही. यामुळे कुटुंब चिंतातूर आहेत. प्रशासन या महत्वाच्या प्रश्नाकडे सपशेल डोळेझाक करीत असल्याची भावना मनात येत असल्याने नागरिकांसह कर्जत आरपीआयच्यावतीने सोमवारपासून नगरपंचायत कार्यालयासमोर आपल्या न्यायिक मागण्या पूर्ण होईपर्यंत भजन, कीर्तन, जलसा तसेच डफडे बजाव आंदोलन सुरू केले आहे. यातील अनेक कुटुंबानी मुख्याधिकारी यांच्यासह तत्कालीन व विद्यमान पदाधिकाऱ्यांवर आणि काही मोजक्या कर्मचाऱ्यांवर रोष व्यक्त करीत त्यांच्या कार्यपद्धतीचा निषेध केला.
यावेळी आरपीआयचे उत्तर महाराष्ट्रचे उपाध्यक्ष अंकुश भैलुमे, युवक उपाध्यक्ष विशाल काकडे, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता कदम, भीमशक्ती संघटनेचे अनिल समुद्र, नंदकिशोर भैलुमे यांच्यासह आदी पीडित कुटुंबानी तीव्र भावना प्रशासनासमोर मांडत यंदा ठोस उपाययोजना केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असे स्पष्ट बजावले. तसेच प्रशासनाने १० डिसेंबरपर्यंत यावर उचित कार्यवाही न केल्यास त्यापुढे आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देखील दिला.



