Kalsubai Shikhar : कळसूबाई शिखरावर पर्यटक दोन तास रांगेत अडकले

Kalsubai Shikhar : कळसूबाई शिखरावर पर्यटक दोन तास रांगेत अडकले

0
Kalsubai Shikhar : कळसूबाई शिखरावर पर्यटक दोन तास रांगेत अडकले
Kalsubai Shikhar : कळसूबाई शिखरावर पर्यटक दोन तास रांगेत अडकले

Kalsubai Shikhar : अकोले : महाराष्ट्रातील (Maharashtra) सर्वात उंच असलेल्या कळसूबाई शिखरावरील (Kalsubai Shikhar) शिडीवरून उतरण्यासाठी रविवारी (ता.७) पर्यटकांना (Tourist) तब्बल दोन तास रांगेत उभे राहावे लागले. यामुळे हजारो पर्यटकांनी मनस्ताप व्यक्त केला.

नक्की वाचा : नगरच्या रेल्वे प्रकल्पांना गती द्या; खासदार नीलेश लंके यांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र

हजारोंच्या संख्येने पर्यटक शिखरावर

कळसूबाई येथे अनेक भाविक व पर्यटकांची मोठी रेलचेल असते. शनिवार, रविवार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक कळसुबाई शिखराला भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने येथे येत असतात. रविवारी अक्षरक्षः हजारोंच्या संख्येने पर्यटक शिखरावर आले होते.  शिखराच्या मध्यावर एकाच शिडीवरून जाणे – येणे असल्याने तेथे पर्यटकांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. पर्यटकांना शिडीपर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास दोन तास रांगेत ताटकळत उभे राहण्याची वेळ आल्याने अबालवृद्ध पर्यटकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. युवक, महिला, वृद्ध या पर्यटकांना जास्त त्रास सहन करावा लागला.

अवश्य वाचा: जिल्हा प्रशासन व महापालिका सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली; अभिषेक कळमकर यांचा आरोप

आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास सोय नाही (Kalsubai Shikhar)

पर्यटकांसाठी तेथे जाण्यासाठी व येण्यासाठी वेगळी शिडी असावी किंवा मोठी शिडी असावी जेणेकरून जाणारे व येणारे त्यात व्यवस्थित चालतील. नवरात्र उत्सवातही तेथे हा प्रकार नेहमी घडत असतो. आजची गर्दी नवरात्रासारखीच होती. विशेष म्हणजे एवढ्या पर्यटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा देखरेखीसाठी शासनाची कोणतीच सोय नाही. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तेथे कोणतीच सोय नाही. तसेच संरक्षण व आधार म्हणून लावलेल्या रेलिंग काही ठिकाणी तुटलेल्या आहेत. त्यांची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. यावर योग्य तो विचार होऊन योग्य अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.