Salary Cut Order : नगर : राज्यभर झालेल्या (ता. ५) रोजी ‘शाळा बंद’ आंदोलनात सहभागी झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा (Teachers and Non-Teaching Employees) एका दिवसाचे वेतन कपातीचा (Salary Cut Order) आदेश तातडीने रद्द करण्यात यावा, अशी ठाम मागणी शिक्षक भारती संघटना आणि संलग्न शिक्षक–शिक्षकेतर संघटनांनी शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे (Dadaji Bhuse) यांच्याकडे केली आहे. अशी माहिती शिक्षक नेते व शिक्षक भारती संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे राज्यसचिव सुनील गाडगे यांनी दिली.
अवश्य वाचा: ऊसतोड कामगार महिलेची रस्त्यातच प्रसुती; जेऊर परिसरात घडली घटना
कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन
राज्यभरातील खासगी अनुदानित, अंशत अनुदानित, शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांनी मोठ्या प्रमाणात ‘शाळा बंद’ आंदोलनात सहभाग घेतला. शैक्षणिक गुणवत्ता टिकविणे, अनुदानित शिक्षणाचे अस्तित्व संरक्षित करणे आणि शिक्षक–शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या निकाली काढण्यासाठी हे आंदोलन पूर्णतः शांततामय आणि संविधानिक मार्गाने करण्यात आले होते.
नक्की वाचा : जामीनावर बाहेर आलेली रील स्टार कोमल काळे पुन्हा पोलिसांच्या ताब्यात
सुनील गाडगे यांनी सांगितले की, (Salary Cut Order)
याप्रकरणी सुनील गाडगे यांनी शिक्षणमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात सांगितले की, “आंदोलन हा आमचा संविधानिक हक्क आहे. शिक्षण संचालकांनी काढलेला वेतन कपातीचा आदेश अन्यायकारक असून तो तातडीने मागे घेणे आवश्यक आहे.” संघटनांनी त्वरित चर्चा घेऊन शैक्षणिक समस्या मार्गी लावण्याची मागणीही केली आहे.
या निवेदनावर राज्याध्यक्ष अशोक बेलसरे, राज्य कार्याध्यक्ष सुभाष मोरे, सचिव सुनील गाडगे, जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, विजय लंके, आनंद झरेकर, विजय कराळे, पुणे विभागीय कार्याध्यक्ष महेश पाडेकर, संजय पवार, सोमनाथ बोंतले, आशा मगर, संजय भुसारी, जॉन सोनवणे, कैलास जाधव, योगेश हराळे, नवनाथ घोरपडे, सचिन शेलार, सुदाम दिघे, मोहंमद समी शेख, रामराव काळे, संभाजी पवार, हनुमंत रायकर, सिकंदर शेख, संतोष देशमुख, किसन सोनवणे, संतोष शेंदुरकर, संभाजी चौधरी, श्रीकांत गाडगे, रेवण घंगाळे, विभावरी रोकडे, मीनाक्षी सूर्यवंशी, रोहिणी भोर, शकुंतला वाळुज, छाया लष्करे, जया गागरे, अनघा सासवडकर, रूपाली बोरुडे, सोनाली अकोलकर तसेच विनाअनुदानित शाळांच्या राज्याध्यक्षा रूपाली कुरूमकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.



