Child Marriage : बालविवाह समस्येवर शासकीय यंत्रणांनी एकत्र येऊन काम करावे: डॉ. मोरे

Child Marriage : बालविवाह समस्येवर शासकीय यंत्रणांनी एकत्र येऊन काम करावे: डॉ. मोरे

0
Child Marriage : बालविवाह समस्येवर शासकीय यंत्रणांनी एकत्र येऊन काम करावे: डॉ. मोरे
Child Marriage : बालविवाह समस्येवर शासकीय यंत्रणांनी एकत्र येऊन काम करावे: डॉ. मोरे

Child Marriage : अकोले : बालविवाह (Child Marriage) समस्येवर ग्रामस्तरावरील सर्व शासकीय यंत्रणांनी एकत्र येऊन प्रामाणिकपणे लढले पाहिजे. यामध्ये जे अधिकारी, कर्मचारी हलगर्जीपणा करतील त्यांच्यावर कडक कारवाई करू, असा इशारा अकोले तालुका बाल संरक्षण समितीचे (Child Protection Committee) अध्यक्ष तथा तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे (Dr. Siddharth More) यांनी दिला आहे.

नक्की वाचा : जीवे मारण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार; भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

राष्ट्रीय मानवाधिकार दिना निमित्त आयोजन

राष्ट्रीय मानवाधिकार दिनाचे निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या बालविवाह कार्यशाळेचे अकोल्यात जिल्हा महिला बाल विकास विभाग अकोले, तहसील कार्यालय तथा अकोले तालुका बाल संरक्षण समिती, श्री समर्थ सेवा ट्रस्ट अंतर्गत रविवारची शाळा यांच्यावतीने आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस निरीक्षक मोहन बोरसे, गटविकास अधिकारी अमर माने, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. श्यामकांत शेटे, जिल्हा महिला बाल कल्याण अधिकारी प्रशांत गायकवाड, स्नेहालयच्या अ‍ॅड. शुभांगी रोहकले, पूजा दहातोंडे, सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी, अ‍ॅड. मंगला हांडे, डॉ. उमा कुलकर्णी, महिला बाल विकास अधिकारी अर्चना एखंडे, शैला गवारी, साऊच्या अध्यक्षा प्रतिमा कुलकर्णी आदी उपस्थित होते.

अवश्य वाचा : रेल्वेमार्गासाठी आमदार किरण लहामटे यांचे अनोखे आंदोलन

तहसीलदार मोरे म्हणाले, (Child Marriage)

बालविवाह हा एक सामाजिक प्रश्‍न निर्माण झाला आहे. बालविवाहाच्या समस्येमुळे महिलांचे भविष्य धोक्यात येत असेल तर ही बाब अत्यंत दुर्दैवी असून यासाठी आपल्याला सर्वांना सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. ग्रामपातळीवर काम करणार्‍या प्रशासकीय यंत्रणेतील विशेषतः ग्रामसेवक, पोलीस पाटील, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशासेविका, शाळांचे मुख्याध्यापक यांनी सतर्क राहिले पाहिजे. कुठे बालविवाह होत असेल तर तातडीने वरिष्ठांना कळवावे आणि विवाह होऊ देऊ नये किंबहुना बारीक लक्ष ठेऊन त्या पालकांचे समुपदेशन करावे. बालविवाह झाला असल्यास पोलिसांना कळवावे, यात कोणीही हलगर्जीपणा करू नये. केल्यास त्यांच्यावर कारवाई करणे अनिवार्य राहील. कायद्याने कारवाई करण्यापूर्वीच या समस्येचे निराकरण करावे. या कार्यशाळेचे फलित जर सांगायचे झाले तर अकोले तालुक्यात यानंतर कुठेच बालविवाह होणार नाही याचीच सर्वांनी काळजी घ्यावी.