Manoj Jarange Patil: कुणबी प्रमाणपत्रावरून मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला थेट इशारा

0
Manoj Jarange Patil: कुणबी प्रमाणपत्रावरून मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला थेट इशारा
Manoj Jarange Patil: कुणबी प्रमाणपत्रावरून मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला थेट इशारा

नगर: हैदराबाद गॅझेटिअरनुसार (Hyderabad Gazetteer) नोंदी आढळतील, त्या मराठा (Maratha) समाजातील अर्जदारांना कुणबी प्रमाणपत्र (Kunbi Certificate) देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुंबईत मोठे आंदोलन केलं होतं. त्यानंतर सरकारने जीआर काढत मनोज जरांगेंची ही मागणी मान्य केली. आता मागणी मान्य झाल्यावर गेल्या तीन महिन्यात मराठवाड्यातील केवळ ९८ जणांना ओबीसी प्रमाणपत्र (OBC Certificate) मिळाले आहे. आठ जिल्ह्यातून केवळ ५९४ अर्ज आले आहेत. पण, त्यातील केवळ ९८ जणांना अर्ज प्रमाणपत्र प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे.

नक्की वाचा: माळीवाडा वेस म्हणजे अहिल्यानगर शहराचे नाक – बाळासाहेब बोराटे

‘मराठ्यांना प्रमाणपत्र द्यायला दिरंगाई करु नका’ (Manoj Jarange Patil)

संभाजीनगरमध्ये १४ अर्ज प्राप्त झाले असून कोणताही अर्ज मान्य झाला नाही, तर परभणीत ४४५ अर्ज प्राप्त झाले आणि त्यापैकी ४७ अर्ज मान्य ठरले. जालन्यात ७८ अर्ज प्राप्त झाले असून आठ अर्ज मान्य ठरले, हिंगोलीमध्ये पाच अर्ज प्राप्त झाले आणि त्यापैकी तीन अर्ज मान्य झाले. नांदेडमध्ये पाच अर्ज प्राप्त झाले आणि सर्व पाच अर्ज मान्य ठरले, तर बीडमध्ये १२ अर्ज प्राप्त झाले आणि त्यापैकी नऊ अर्ज मान्य झाले. लातूरमध्येही १२ अर्ज प्राप्त झाले असून नऊ अर्ज मान्य ठरले, तर धाराशिवमध्ये तेरा अर्ज प्राप्त झाले आणि त्यापैकी चार अर्ज मान्य ठरले आहे. आता यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मराठ्यांना प्रमाणपत्र द्यायला दिरंगाई करु नका,असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे

हेही पहा: माळीवाडा वेस म्हणजे अहिल्यानगर शहराचे नाक – बाळासाहेब बोराटे

‘मराठ्यांना तातडीने कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी’  (Manoj Jarange Patil)

मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री साहेब आणि विखे पाटील साहेबांना सांगणे आहे की, तुम्ही मराठा समाजाच्या हितासाठी जीआर काढलेला आहे. अधिकाऱ्यांना तुम्ही तातडीचे आदेश द्या की, ज्या नोंदी सापडलेल्या आहेत त्याचे कुणबी प्रमाणपत्र द्या. शिंदे समितीला आदेश द्या की, त्यांनी नोंदी तात्काळ शोधाव्या. हैदराबाद गॅझेटिअरच्या जीआरप्रमाणे मराठ्यांना तातडीने कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी विनंती त्यांनी केली.