Tofkhana Police Station : नगर : शहरातील कल्याण रस्त्यावरील रेल्वे पुलावर गुरूवारी (ता. ११) वाहतूक सुरळीत करण्यासाठी कर्तव्य बजावत असलेल्या तोफखाना पोलीस ठाण्याच्या दोन पोलीस अंमलदारांना मारहाण (Beating) करणाऱ्यांना संशयित आरोपींना (Accused) तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. बाळासाहेब भापसे व अविनाश बर्डे असे जखमी अंमलदारांची नावे आहेत. भापसे यांनी दिलेल्या जबाबावरून तोफखाना पोलीस ठाण्यात (Tofkhana Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवश्य वाचा : मोठी बातमी!अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार
यांच्याविरूध्द गुन्हा दाखल
प्रणव दिलीप गडाख, अक्षय दीपक राठोड, दिगंबर बंडु कांडेकर, निखील नारायण होळकर, सचिन बाळासाहेब गडाख (सर्व रा. नेप्ती, ता. अहिल्यानगर) व इतर दोन ते तीन अनोळखी यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले होते. त्यांना आज न्यायालयात दाखल केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
नक्की वाचा : जगातील पहिली सापाचं विष शोधणारी किट विकसित; डॉ. शाम भट यांच्या प्रयत्नांना यश
हत्याराने कान, जबडा, डोळ्यावर प्रहार (Tofkhana Police Station)
याबाबत माहिती अशी गुरूवारी (ता. ११) सकाळी भापसे व बर्डे हे कल्याण रस्त्यावर वाहतूक कोंडी सोडवित असताना एक मोपेड मार्गात लावलेली दिसली. ही मोपेड हटविण्यास सांगितल्यावर प्रणव गडाख हा भडकून तु कोण सांगणारा? अशी उर्मट भाषा करत पोलिसांची ओळखपत्रे दाखवूनही सहकार्याला नकार दिला. प्रणव गडाखने अचानक भापसे यांच्या हातातील मोबाईलवर फाईट मारत व्हिडीओ काढण्यास विरोध केला. त्याचवेळी त्याने फोन करून साथीदारांना बोलावून घेतले. काही मिनिटांतच इतर साथीदार दुचाकीवरून घटनास्थळी येऊन थेट पोलिसाला लक्ष्य केले. भापसे यांना खाली पाडले व मारहाण केली. टणक हत्याराने कान, जबडा, डोळ्यावर प्रहार केला. झटापटीत गळ्यातील सोन्याची चैन गहाळ झाली. बर्डे यांना देखील मारहाण करून जखमी केले. मारहाणीत भापसे गंभीर जखमी झाले होते.



