Late Gopinath Munde : स्व.गोपीनाथ मुंडे यांनी जे पेरले ते आज सत्तेच्या रूपाने उगवले आहे : अनिल मोहिते

Late Gopinath Munde : स्व.गोपीनाथ मुंडे यांनी जे पेरले ते आज सत्तेच्या रूपाने उगवले आहे : अनिल मोहिते

0

Late Gopinath Munde : नगर : लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे (Late Gopinath Munde) हे खऱ्या अर्थाने भाजपचे (BJP) आधारस्तंभ होते. ग्रामीण भागात भाजपाची पायामुळे रोवण्याचे व सर्वांना बरोबर घेत पक्ष वाढीत त्यांचा सिंहाचा वाट आहे. आज भाजप देशात नव्हेतर जगात सर्वात मोठा राजकीय पक्ष झाला आहे. यासाठी स्व.गोपीनाथ मुंडे यांनी जे पेरले ते आज सत्तेच्या रूपाने उगवले आहे. अशा महान नेत्याच्या विचारावर मार्गक्रमण करत पक्षाचे काम सुरु आहे, असे प्रतिसाद भाजपचे अहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते (Anil Mohite) यांनी केले.

अवश्य वाचा : मोठी बातमी!अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार

पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती

लोकनेते व दिवंगत केंद्रीयमंत्री स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर शहर भाजपच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी स्व. मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. पक्ष कार्यलयात झालेल्या या कार्यक्रमास पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Late Gopinath Munde : स्व.गोपीनाथ मुंडे यांनी जे पेरले ते आज सत्तेच्या रूपाने उगवले आहे : अनिल मोहिते
Late Gopinath Munde : स्व.गोपीनाथ मुंडे यांनी जे पेरले ते आज सत्तेच्या रूपाने उगवले आहे : अनिल मोहिते

नक्की वाचा : जगातील पहिली सापाचं विष शोधणारी किट विकसित; डॉ. शाम भट यांच्या प्रयत्नांना यश

सरचिटणीस निखील वारे म्हणाले, (Late Gopinath Munde)

स्व.गोपीनाथ मुंडे यांनी प्रतिकूल परिस्थितीत पक्षासाठी योगदान देऊन शहरी व ग्रामीण भागात पक्षाचे काम वाढले. गोरगरीब, कष्टकरी नागरिकांसाठी काम केले. त्यांच्या पाश्च्यात मंत्री पंकजा मुंडे या त्यांचा वारसा पुढे चालवत आहेत.

मोहिते म्हणाले, स्व. मुंडे हे संघाच्या व विद्यार्थी परिषदेच्या मुशीतून तयार झालेल्या या नेतृत्वाने राज्यासह देशाला दिशा देण्याचे काम केले. त्यांच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीस यांच्या सरखे अनेक नेते घडले व आज राज्याचा व देशाचा कारभार सक्षमपणे व्यवस्थित चालवत आहेत. यावेळी महिला भाजपाचे अध्यक्ष प्रिया जानवे, देवेंद्र बंब, सोनाली पाठक, संजय गायकवाड, ज्योती दांडगे, ज्ञानेश्वर काळे, बाबासाहेब सानप, सुनील सकट, लखन साळवे, अशोक भोसले, राम पेटारे, अमर भोसले, मयूर ताठे, अरुण शिंदे, दत्ता गाडळकर, महेश तवले, विशाल नाकाडे, रामदास आंधळे, राहुल जामगावकर, अभिषेक शिंदे, मयुर वाडेकर, सार्थक आगरकर, सुरज मोहिते, सुजाता औटी, कालिंदी केसकर, ज्ञानेश्वर धिरडे, धनंजय जाधव, सविता कोटा, प्रिया बंब, संपत नलावडे, बाळासाहेब गायकवाड, सचिन पळशीकर, रोहिणी कोडम व नितीन थोरात आदी पदाधिकारी उपस्थित.