Rupali Kadam : कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषिकन्या तर्फे मूल्यमापन सर्वेक्षण : रुपाली कदम 

Rupali Kadam : कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषिकन्या तर्फे मूल्यमापन सर्वेक्षण : रुपाली कदम 

0
Rupali Kadam : कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषिकन्या तर्फे मूल्यमापन सर्वेक्षण : रुपाली कदम 
Rupali Kadam : कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषिकन्या तर्फे मूल्यमापन सर्वेक्षण : रुपाली कदम 


Rupali Kadam : नगर : ग्रामीण कृषी जागरूकता (Agricultural Awareness) कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत ग्रामीण मूल्यमापन सर्वेक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या सक्रिय सहभागाने सामाजिक नकाशा, जलसंसाधन नकाशा, दळणवळण नकाशा, प्रमुख पिके, शेती यांत्रिकीकरण, नकाशाचा वापर करून विद्यार्थिनींनी गावातील विविध अडचणी जाणून घेतल्या आहेत. तसेच गावकऱ्यांसमवेत चर्चा करून त्यांचे अभिप्राय घेण्यात आले असल्याचे मत सरपंच रुपाली कदम (Rupali Kadam) यांनी व्यक्त केले. अहिल्यानगर तालुक्यातील मांजरसुंबा येथे डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी महाविद्यालयातील कृषिकन्यांनी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत ग्रामीण मूल्यमापन सर्वेक्षणाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी त्या बोलत होत्या.

अवश्य वाचा : मोठी बातमी!अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार

शिक्षकवृंद, शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. सोमेश्वर राऊत, उपप्राचार्य प्रा. डॉ. हरिभाऊ शिरसाठ, कार्यक्रम समन्वयक तथा कृषी विस्तार विषय तज्ञ  प्रा. किरण दांगडे, प्रा. पूनम ठोंबरे, जिल्हा परिषद राजेंद्र देसले, उपसरपंच जालिंदर कदम, विलास भुतकर व ग्रामपंचायत सदस्य  ग्रामविकास अधिकारी सारिका वाळुंज, कृषिकन्या वैष्णवी बनकर, वर्षा चव्हाण,  प्रगती देवकर, अक्षदा फराटे, सिद्धी गाडे,  प्रार्थना जाधव यांच्यासह जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चे शिक्षकवृंद, शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते. 

नक्की वाचा : जगातील पहिली सापाचं विष शोधणारी किट विकसित; डॉ. शाम भट यांच्या प्रयत्नांना यश

सर्वेक्षणातून शेतकऱ्यांच्या अडचणी घेतल्या जाणून (Rupali Kadam)

यावेळी गावातील विकासा संधर्भात विविध संसाधने आणि सामाजिक संस्थांचे चित्रण करण्यासाठी विविध रंगाच्या रांगोळी वापरून जमिनीवर सामाजिक संसाधन नकाशा तयार करण्यात आले. या सर्वेक्षणाद्वारे विद्यार्थिनींनी ग्रामीण जीवनातील शेतकऱ्यांचे जीवन त्यांचा शेती व्यवसाय आणि संबंधित अडचणी जाणून घेतल्या.