Crop Demonstration : पिंपळगाव माळवी येथे महाबीज तूर ‘गोदावरी’चे पीक प्रात्यक्षिक; कृषिकन्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

Crop Demonstration : पिंपळगाव माळवी येथे महाबीज तूर ‘गोदावरी’चे पीक प्रात्यक्षिक; कृषिकन्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

0

कृषी विभाग व महाबीज संयुक्त उपक्रम; महाविस्तार AI ॲपविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन

Crop Demonstration : नगर : पिंपळगाव माळवी (ता. नगर) येथे महाबीज (Mahabeej) तूर ‘गोदावरी’ वाणाच्या पीक प्रात्यक्षिक (Crop Demonstration) कार्यक्रमास वरिष्ठ अधिकारी, कृषी तज्ज्ञ आणि RAWE कार्यक्रमातील कृषिकन्यांचा उत्स्फूर्त सहभाग मिळाला.

अवश्य वाचा : मोठी बातमी!अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार

कृषी अधिकाऱ्यांची उपस्थिती

कृषी विभाग महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित (महाबीज), अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळगाव माळवी येथे प्रगतशील शेतकरी श्री. प्रतापराव गणपतराव झिने यांच्या शेतावर महाबीज तूर ‘गोदावरी’ वाणाच्या पीक प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मा. श्री. सुधाकर बोराळे तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. राजाभाऊ मोराळे (विभागीय व्यवस्थापक, महाबीज जालना), मा. श्री. दत्तात्रय डमाळे (उपविभागीय कृषी अधिकारी, अहमदनगर), मा. श्री. प्रदीप लाटे (प्रकल्प समन्वयक, आत्मा), मा. श्री. सुनील दौंड (जिल्हा व्यवस्थापक, महाबीज), मा. श्री. नितीन दानवले (प्रमुख शास्त्रज्ञ, राहुरी) व मा. श्री. अशोक वाळके (तालुका कृषी अधिकारी) उपस्थित होते.

Crop Demonstration : पिंपळगाव माळवी येथे महाबीज तूर ‘गोदावरी’चे पीक प्रात्यक्षिक; कृषिकन्यांचा उत्साहपूर्ण सहभाग
Crop Demonstration : पिंपळगाव माळवी येथे महाबीज तूर ‘गोदावरी’चे पीक प्रात्यक्षिक; कृषिकन्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

यावेळी श्री. रविंद्र काळभोर, श्री. विजय सोमवंशी, श्रीमती माधवी घोरपडे, श्री. योगेश घोलप तसेच प्रगतशील शेतकरी श्री. प्रतापराव झिने यांची उपस्थिती नोंदवली गेली.

नक्की वाचा : जगातील पहिली सापाचं विष शोधणारी किट विकसित; डॉ. शाम भट यांच्या प्रयत्नांना यश

कृषिकन्यांच्या मार्गदर्शनाखाली सहभाग(Crop Demonstration)

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचालित कृषी महाविद्यालय, विळदघाट येथील RAWE & AIA सत्र २०२५–२६ मधील कृषिकन्या अश्विनी मुळे, साक्षी मुठे, मानसी निमसे, प्रतीक्षा राऊत, साक्षी रोडे व किरण सावंतफुले यांनी प्राचार्य प्रा. डॉ. सोमेश्वर राऊत, प्रा. किरण दांगडे व प्रा. पूनम ठोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहभाग नोंदवला.

कृषिकन्यांनी शेतकऱ्यांना ‘महाविस्तार AI’ ॲपविषयी माहिती दिली. कृषि विभागाद्वारे विकसित हे आधुनिक डिजिटल व्यासपीठ शेतकऱ्यांना हवामान, बाजारभाव, तांत्रिक सल्ला व इतर कृषी सेवा एका ठिकाणी उपलब्ध करून देते, ज्यामुळे उत्पादनक्षमता आणि निर्णयक्षमता वाढण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात आले.