Sugarcane Workers : ऊसतोडणी कामगारांच्या मुलांचे शिक्षण वाऱ्यावर; अनेक मुलं उसाच्या फडात आणि पालावरच

Sugarcane Workers : ऊसतोडणी कामगारांच्या मुलांचे शिक्षण वाऱ्यावर; अनेक मुलं उसाच्या फडात आणि पालावरच

0

Sugarcane Workers : कर्जत: तालुक्यातील बागायती पट्ट्यात ऊसतोडणी हंगाम सुरू झाला असून यासाठी बीड, परभणी, जालना, लातूर, छत्रपती संभाजीनगर यासह राज्यातील कानाकोपऱ्यातून ऊस तोडणी कामगार (Sugarcane Workers) चंबू-गभाळा सह ठिकठिकाणी दाखल झाले आहेत. यात त्यांच्या लहान मुलांचा देखील समावेश आहे. या चार-पाच महिन्याच्या काळात त्यांचे शिक्षण (Education) आणि बालपण उसाच्या फडातच गुजरते. बहुतांश ठिकाणी साखर शाळा (Sugar School) फक्त कागदोपत्रीच दिसते. आई-बापाच्या नशिबी आलेलं अठरा विश्व दारिद्र्य त्यांच्या माथी देखील मारले जात असल्याचे उदाहरणे या काळात सभोवताली पहावयास मिळते.

नक्की वाचा : मोदी सरकारनं ‘मनरेगा’चं नाव बदललं;नवीन नाव काय ?

लहान मुलांचे देखील पालकांसोबत स्थलांतर

दिवाळी सण झाला की साखर कारखाने सुरू होतात. गळीत हंगाम ऊसतोडणीसाठी बीड, परभणी, जालना, लातूर, छत्रपती संभाजीनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव यासह राज्यातील कानाकोपऱ्यातून ऊस तोडणी कामगार आपल्या कुटुंबासह उचल घेतलेल्या मुकादमाच्या ठिकाणी गावोगावी दाखल होतात. गुलाबी थंडीत पहाटेपासून सुरू झालेले ऊस तोडणीचे काम संध्याकाळी अंधार पडेपर्यंत अविरत सुरू असते. त्यामुळे या जोडप्या सोबत त्यांची लहान मुले देखील त्यांच्या सोबत स्थलांतर होतात.

अवश्य वाचा : पोलिसांवर हल्ला करणाऱ्या संशयितांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

त्या मुलांच्या शिक्षणाचं काय? (Sugarcane Workers)

कर्जत तालुक्यात बागायती उसाच्या पट्ट्यात आणि साखर करखान्याच्या लगत ही लहान मुले त्या शेतात किंवा तात्पुरत्या उभारलेल्या पालात कुठे ही खेळताना अथवा बसलेले निदर्शनास येतात. त्यांची सुरक्षितता देखील चव्हाट्यावर येते. एकीकडे महाराष्ट्र सरकार दरवर्षी या ऊसतोडणी कामगारांच्या मुलांच्या शिक्षणात कुठेच खंड पडू नये म्हणून कारखाने अथवा उसाच्या शेती पट्ट्यात साखर शाळा निर्माण करण्याची मोहीम राबवतात. मात्र, त्याची अंमलबजावणी हातावर मोजण्या इतकीच असते. ही ऊसतोडणी कामगारांची मुले आपल्या आई-वडिलांसोबतच त्या उसाच्या फडात आपले बालपण घालवताना दिसतात. साखर शाळा योजना फक्त नावापुरतीच राहते. त्या मुलांच्या शिक्षणाचं काय? असा सवाल निश्चित उभा राहतो.

Sugarcane Workers : ऊसतोडणी कामगारांच्या मुलांचे शिक्षण वाऱ्यावर; अनेक मुलं उसाच्या फडात आणि पालावरच
Sugarcane Workers : ऊसतोडणी कामगारांच्या मुलांचे शिक्षण वाऱ्यावर; अनेक मुलं उसाच्या फडात आणि पालावरच

ऊसतोडणीसाठी आई-वडिलांसोबत ही लहान मुले देखील ठिकठिकाणी स्थलांतर करताना दिसतात. त्याची शाळा, शिक्षण त्यांचा बौद्धिक विकास याच उसाच्या कोयत्या सोबत फिरला जातो. जे भोग आई-वडील अल्प शिक्षणामुळे भोगत आहे. तेच जगणं या लहान मुलांच्या नशिबी थोपवले जात आहे ? असा प्रश्न देखील उभा राहत आहे. याची ऊसतोडणी पूर्ण करून दिवसभर मर-मारणारे आई-वडीलांच संघर्षमय जगणं पाहून ही कोवळी जीव आपलं विश्व देखील हेच आहे असा ग्रह करीत आलेला दिवस पुढे रेटत आहे. तसेच त्यांची सुरक्षितता महत्वाची असल्याने त्यांना गावी ठेवू शकत नाही, अशी शोकांतिका देखील काही कुटुंब व्यक्त करताना दिसतात.