
Municipal Corporation Election: राज्यातील राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत असलेल्या महापालिका (Municipal Corporation) आणि जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) निवडणुकांच्या तारखा आज (ता. १५) जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोग (State Election Commission) आज संध्याकाळी ४ वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. ही पत्रकार परिषद अत्यंत महत्त्वाची असून यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेळापत्रक घोषित केले जाईल,असं बोलले जात आहे.
नक्की वाचा: मोदी सरकारनं ‘मनरेगा’चं नाव बदललं;नवीन नाव काय ?
महापालिका आणि जिल्हा परिषदेचा कार्यक्रम जाहीर होणार (Municipal Corporation Election)

राज्य निवडणूक आयोगाने ही पत्रकार परिषद मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित केली आहे. या पत्रकार परिषदेत आयोगाकडून महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तारखा आणि संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला जाईल,अशी माहिती समोर येत आहे. राज्याच्या राजकारणावर परिणाम करणाऱ्या या निवडणुकांनाछोटी विधानसभा म्हणूनही ओळखले जाते. या निवडणुकीमुळे राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहरांमधील कारभाराची दिशा ठरणार आहे. या बहुप्रतिक्षित निवडणूक कार्यक्रमात प्रामुख्याने खालील १५ मोठ्या महापालिकांचा समावेश असेल, अशी माहिती समोर येत आहे.
अवश्य वाचा: सक्षम ताटे प्रकरणातील मारेकऱ्याचं इन्स्टाग्राम अकाउंट लाइव्ह,नेमका प्रकार काय ?
निवडणुका लांबणीवर पडण्याची प्रमुख कारणे (Municipal Corporation Election)
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनेक दिवसांपासून लांबणीवर पडण्यामागे काही महत्वाची कारणे आहेत. यात प्रामुख्याने ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा समोर आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतर मागासवर्गीयांना राजकीय आरक्षण देण्यासाठी आवश्यक असलेली तिहेरी चाचणी पूर्ण करण्याची प्रक्रिया प्रलंबित होती. आयोगाने या प्रकरणी इम्पिरिकल डेटा गोळा करून अहवाल सादर केल्यानंतर हा कायदेशीर अडथळा दूर झाला आहे. तसेच प्रभाग रचनेत करण्यात आलेले बदल आणि त्यानंतर सत्तांतरानंतर पुन्हा जुनी प्रभाग रचना लागू करण्याच्या निर्णयाविरोधात दाखल झालेल्या न्यायालयीन याचिकांमुळे अंतिम प्रभाग रचना निश्चित होण्यास उशीर झाला होता. आता हे दोन्ही प्रमुख अडथळे दूर झाले आहेत. त्यामुळे राज्य निवडणूक आयोग आज निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करेल, अशी जोरदार शक्यता आहे.


