Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी; ३१ डिसेंबरनंतर ‘या’ लाडक्या बहिणींचा लाभ थांबणार

0
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी; ३१ डिसेंबरनंतर 'या' लाडक्या बहिणींचा लाभ थांबणार
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी; ३१ डिसेंबरनंतर 'या' लाडक्या बहिणींचा लाभ थांबणार

नगर : लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) लाभार्थी महिलांसाठी ई-केवायसी (E-Kyc) करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ३१ डिसेंबरपर्यंत (December 31) ते पूर्ण न केल्यास दरमहा मिळणारे १५०० रुपये थांबतील. अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची आहे. आता अंगणवाडी सेविका (Anganwadi worker) घरी जाऊन ई-केवायसी पूर्ण करण्यास मदत करणार आहेत, ज्यामुळे पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळत राहील.

नक्की वाचा: राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद;महापालिका व जिल्हा परिषदेच्या तारखा जाहीर होणार?

ई केवायसीला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ (Ladki Bahin Yojana)

लाडकी बहीण योजनेतील बोगस लाभार्थी वगळण्यासाठी महिला व बालविकास विभागाकडून ईकेवायसी बंधनकारक करण्यात आले. ई केवायसीची मुदत १८ नोव्हेंबरपर्यंत होती, त्यानंतर ती वाढवून ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मात्र त्यानंतरही अनेक महिलांना ईकेवायसी करण्यात अडचणी येत आहेत. यासाठी संगणकीय प्रणालीत सुधारणा केल्यानंतर आता या ईकेवायसीची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर सोपविण्यात आली आहे. त्याअंतर्गत ज्या महिलांचे ईकेवायसी अद्यापही झालेले नाही, अशा महिलांच्या घरोघरी जाऊन त्यांची कागदपत्रे गोळा करून त्यांचे ईकेवायसी हे अंगणवाडी सेविकांकडून केले जाणार आहे. 

अवश्य वाचा: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ;नवीन दर काय ? 

३१ डिसेंबर केवायसी केली नाही तर …   (Ladki Bahin Yojana)

ई-केवायसी प्रक्रिया अनेक महिलांकडून अपूर्ण राहिल्यामुळे त्यांना योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यात अडथळे येत होते. मात्र, आता अंगणवाडी सेविका स्वतः या महिलांच्या घरी जाऊन आवश्यक कागदपत्रे तपासतील. या अंगणवाडी सेविकांच्या मदतीने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे सुलभ होणार आहे. मात्र लाडक्या बहिणींनी ३१ डिसेंबरपर्यंत ई-केवायसी केली नाही, तर मात्र त्यांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे. त्यामुळे ई-केवायसी पूर्ण न करणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गंत मिळणारे दरमहा १५०० रुपये मिळणार नाही, त्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार नाहीत.