Kidnapping : वाशीममधून अपहरण झालेल्या व्यक्तीची अहिल्यानगरमध्ये सुटका; एमआयडीसी पोलिसांकडून दोघे जेरबंद  

Kidnapping : वाशीममधून अपहरण झालेल्या व्यक्तीची अहिल्यानगरमध्ये सुटका; एमआयडीसी पोलिसांकडून दोघे जेरबंद  

0
Kidnapping : वाशीममधून अपहरण झालेल्या व्यक्तीची अहिल्यानगरमध्ये सुटका; एमआयडीसी पोलिसांकडून दोघे जेरबंद  
Kidnapping : वाशीममधून अपहरण झालेल्या व्यक्तीची अहिल्यानगरमध्ये सुटका; एमआयडीसी पोलिसांकडून दोघे जेरबंद  

Kidnapping : नगर: वाशीम येथून अपहरण (Kidnapping) झालेल्या व्यक्तीची अहिल्यानगर येथून सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई एमआयडीसी पोलीस ठाण्याचे (MIDC Police Station) सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी (Manik Chaudhary) यांनी नगर-मनमाड रस्त्यावरील कॉटेज कॉर्नवर केली. राहुल दिलीप म्हस्के (वय ३२, रा नागेवाडी, ता. जि. जालना), सतीश  विनायक जाधव (वय २९, रा.लकडकाटे, ता. जि. जालना), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. सीताराम सखाराम खानझोडे (वय ५८, रा आसेगाव, पेन, ता. रिसोड, जि वाशीम) यांची सुटका करण्यात आली आहे.

अवश्य वाचा: लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवूनच रेल्वे मार्गाचे निर्णय व्हावेत : विखे पाटील

याबाबत माहिती अशी की,

वाशीम येथून एका व्यक्तीचे अपहरण झाल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी मिळाली. त्यानुसार त्यांनी एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिली. छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर शेंडी बायपासहून दूध डेरी चौकाकडे येत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलिसांनी दूध डेअरी चौकात नाकाबंदी केली. त्यावेळी एक चारचाकी बेजबाबदारपणे चालवत असल्याचे आढळून आले. तिला अडवण्याचा प्रयत्न केलास ती नगर-मनमाड रस्त्याहून अहिल्यानगर शहराकडे गेली. त्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सायनाक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या पथकाने सीना नदी पुलाजवळील कॉटेज कॉर्नर परिसरात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी अपहरण केलेल्या  सीताराम सखाराम खानझोडे (वय ५८), याची सुटका केली.

नक्की वाचा : राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद;महापालिका व जिल्हा परिषदेच्या तारखा जाहीर होणार?

आरोपींना वाशीमच्या गुन्हे शाखेकडे साेपविले(Kidnapping)

याबाबत संबंधित संशयित आरोपींना वाशीमच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडे देण्यात आले आहे. ही कारवाई एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, पोलीस अंमलदार सतीश खामकर, सुरज देशमुख, अक्षय रोहकले यांच्या पथकाने केली.