Maharashtra Local Body Election Update : राज्यात पालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं; 15 जानेवारीला मतदान 16 जानेवारीला मतमोजणी

Maharashtra Local Body Election Update : राज्यात पालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं; 15 जानेवारीला मतदान 16 जानेवारीला मतमोजणी

0
Maharashtra Local Body Election Update : राज्यात पालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं; 15 जानेवारीला मतदान 16 जानेवारीला मतमोजणी
Maharashtra Local Body Election Update : राज्यात पालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं; 15 जानेवारीला मतदान 16 जानेवारीला मतमोजणी

मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील एकूण 29 महापालिकांच्या निवडणुकांचं बिगुलं अखेर वाजलं

Maharashtra Local Body Election Update : मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील एकूण 29 महापालिकांच्या निवडणुकांचं (Maharashtra Local Body Election Update) बिगुलं अखेर वाजलं असून, राज्य मुख्य निवडणूक आयुक्त (State Chief Election Commissioner) दिनेश वाघमारे यांनी पत्रकार (Maharashtra Election Commission) परिषद घेऊन महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यानुसार मतदान 15 जानेवारी 2026 आणि मतमोजणी 16 जानेवारी रोजी पार पडणार आहे.

अवश्य वाचा: लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवूनच रेल्वे मार्गाचे निर्णय व्हावेत : विखे पाटील

निवडणूक आयोगाची पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे

२९ महापालिकांच्या निवडणुकांमध्ये नामनिर्देशन पत्र ऑफलाईन घेतले जातील, राखीव जागांवर ज्यांना निवडणुक लढवायची आहे त्यांना सहा महिन्याच्या आत जात प्रमाणपत्र सादर करावे लागणार, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे. 1 जुलै 2025 ची मतदार यादी वापरली जाईल. नावं जोडण आणि वगळ याचा अधिकार आम्हाला नाही. मुंबई महापालिकेसाठी 10 हजार 111 मतदान केंद्र असतील. संभाव्य दुबार मतदारांच्या घरी जाऊन सर्वेक्षण केलं आहे. 11 लाख दुबार मतदारांची नोंद सापडली आहे. मताधिकार हे ॲप तयार केलं आहे, त्यावर माहिती कळणार आहे. मतदान केंद्रावर दिव्यांग आणि ज्येष्ठांसाठी पूर्ण सुविधा असेल. प्रत्येक मतदान केंद्रावर पिण्याच पाणी, विज, सावली, हे सगळ उपलब्ध असेल. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून 290 लोकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Maharashtra Local Body Election Update
Maharashtra Local Body Election Update

नक्की वाचा : वाशीममधून अपहरण झालेल्या व्यक्तीची अहिल्यानगरमध्ये सुटका

48 तास अगोदर प्रचार संपणार (Maharashtra Local Body Election Update)

प्रचार कालावधी संपल्यानंतर सोशल मीडिया आणि मुद्रीत माहिती प्रसारीत करता येणार नाही. 48 तास अगोदर प्रचार संपणार आहे. राजकीय पक्षांसोबत बैठका घेऊन त्यांच्या सुचनाही विचारात घेणार. स्टार प्रचारकांची संख्या 20 वरून 40 करण्यात आल्याचे वाघमारे यांनी सांगितले. नामनिर्देशन पत्र 23 ते 30 डिसेंबर 2025 दरम्यान स्वीकारले जाणार असून,  छाननी 31 डिसेंबर 2025 करण्यात येणार आहे. अर्ज मागे 2 जानेवारी 2026,  निवडणूक चिन्ह वाटप अंतिम उमेदवारांची यादी 3 जानेवारीला जाहीर केली जाणार आहे.

कोणत्या 29 महापालिकेची निवडणूक होणार?

1. अहिल्यानगर महानगरपालिका
2. अकोला महानगरपालिका
3. अमरावती महानगरपालिका
4. भिवंडी निजामपूर महानगरपालिका
5. बृहन्मुंबई महानगरपालिका
6. चंद्रपूर महानगरपालिका
7. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका
8. धुळे महानगरपालिका
9. इचलकरंजी महानगरपालिका
10. जळगाव महानगरपालिका
11. जालना महानगरपालिका
12. कल्याण डोंबिवली महानगरपालिका
13. कोल्हापूर महानगरपालिका
14. लातूर महानगरपालिका
15. मालेगाव महानगरपालिका
16. मीरा भाईंदर महानगरपालिका
17. नागपूर महानगरपालिका
18. नांदेड वाघाळा महानगरपालिका
19. नाशिक महानगरपालिका
20. नवी मुंबई महानगरपालिका
21. पनवेल महानगरपालिका
22. परभणी महानगरपालिका
23. पिंपरी चिंचवड महानगरपालिका
24. पुणे महानगरपालिका
25. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका
26. सोलापूर महानगरपालिका
27. ठाणे महानगरपालिका
28. उल्हासनगर महानगरपालिका
29. वसई विरार महानगरपालिका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here