Local Crime Branch : गावठी कट्ट्याचा धाक दाखवत रस्तालूट करणारे चौघे जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Local Crime Branch : गावठी कट्ट्याचा धाक दाखवत रस्तालूट करणारे चौघे जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

0
Local Crime Branch : गावठी कट्ट्याचा धाक दाखवत रस्तालूट करणारे चौघे जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Local Crime Branch : गावठी कट्ट्याचा धाक दाखवत रस्तालूट करणारे चौघे जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Local Crime Branch : नगर : पाथर्डी तालुक्यातील खांडगाव परिसरात गावठी कट्ट्याचा (Country-made pistol) तसेच चाकूचा धाक दाखून ट्रॅव्हल्स लुटणारे चौघे संशयित आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने जेरबंद केले आहे. ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपी हे सराईत गुन्हेगार (Hardened Criminal) असून त्यांनी विविध ठिकाणी ५ जबरी चोरीचे गुन्हे केले असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

नक्की वाचा: राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद;महापालिका व जिल्हा परिषदेच्या तारखा जाहीर होणार?

ट्रॅव्हल्स अडवून गावठी लुटले

सलमान जमादार पठाण (वय २४, रा. बस स्टॅन्ड मागे, करंजी, ता.पाथर्डी जि. अहिल्यानगर), ओम बाळासाहेब वांढेकर (वय १९, रा. खांडगाव, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर), सोफीयान फारुख भालदार वय १९ रा. नाईकवाडी मोहल्ला, शेवगाव, ता.शेवगाव जि. अहिल्यानगर),असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार त्रिभुवनवाडी ते खांडगाव जाणारे रस्त्यावर ट्रॅव्हल्सला चारचाकी लावून जीवे ठार मारण्याची धमकी देत गावठी पिस्तुल व चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिणे, रोख रक्कम लुटणारे संशयित आरोपी हे करंजी घाटात दगडवाडी परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले.

अवश्य वाचा: ‘मनरेगा’तून महात्मा गांधींचे नाव गायब होणार,’विकसित भारत जी राम जी’ नावाने नवा कायदा c

पाच गुन्हे केल्याचे पोलीस तपासात समोर (Local Crime Branch)

त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी इतर ठिकाणी आणखी पाच गुन्हे केले असल्याचे पोलीस तपासात समोर आले. हे गुन्हे साहिल शाकीर शेख (वय १८, रा. माळीबाभुळगाव ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर), विवेक एलिया बनकर (वय २४, रा.करंजी ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर), यांनी केला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक हरिष भोये, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार सुरेश माळी, फुरकान शेख, राहुल द्वारके, बाळासाहेब नागरगोजे, सोमनाथ झांबरे, प्रकाश मांडगे, बाळासाहेब गुंजाळ, किशोर शिरसाठ, बाळासाहेब खेडकर, सतीश भवर, आकाश काळे, प्रशांत राठोड, चाकल चंद्रकांत कुसळकर, भगवान धुळे यांच्या पथकाने केली.