Murder : नगर: बोल्हेगाव येथील दोन दिवसांपूर्वी झालेल्या ४० वर्षीय महिलेच्या खुनाचा (Murder) उलगडा स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने केला आहे. चोरीच्या उद्देशाने महिलेचा गळा चिरला असल्याचे पोलीस (Police) तपासात पुढे आले आहे. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने चार संशयित मुलींना ताब्यात घेतले आहे. त्यापैकी दोन अल्पवयीन असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
नक्की वाचा : गावठी कट्ट्याचा धाक दाखवत रस्तालूट करणारे चौघे जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
२ अल्पवयीन मुलींनाही घेतले ताब्यात
दिव्या अंकुश देशमुख ऊर्फ दिव्या विजय खाडे (वय २०,रा. भारत बेकरीच्या पाठीमागे, बालाजी नगर, बोल्हेगाव, ता. जि. अहिल्यानगर), अंजुम ऊर्फ मेहक अहमद सैफी (वय २२, रा. मोरया पार्क, बोल्हेगाव, ता. जि. अहिल्यानगर मुळ रा. ११३, गल्ली नं. एफ ब्लॉक, चांद बाग, करावल नगर, नॉर्थ इस्ट दिल्ली), तसेच दोन १६ वर्षीय अल्पवयीन मुलींना ताब्यात घेतले आहे.
अवश्य वाचा: वाशीममधून अपहरण झालेल्या व्यक्तीची अहिल्यानगरमध्ये सुटका;
आरडाओरडा केल्याने गळ्यावर व हनुवटीवर धारदार शस्त्राने वार (Murder)
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार तसेच तांत्रिक विश्लेषणानुसार हा गुन्हा दिव्या देशमुख हिने तिच्या महिला साथीदारांसह केला आल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून संशयित महिला आरोपीस ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता दिव्या देशमुख हिने तिचे माहेर हे मयत मनिषा बाळासाहेब शिंदे (वय ४०, रा. शनि मंदीराजवळ, कौस्तुभ कॉलनी, भारत बेकरी रोड, बोल्हेगाव) महिलेचे शेजारी असून तिस महिलेकडे असलेल्या दागिण्यांबाबत माहिती होती. दिव्या देशमुख हिने तिच्या साथीदार यांना बोलावुन घेऊन मयत महिलेच्या घरामध्ये जाऊन त्यांनी मयत महिला हिचे गळ्यातील दागिने बळजबरीने काढुन घेत असतांना तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केल्याने महिलेच्या गळ्यावर व हनुवटीवर धारदार शस्त्राने वार करुन तिचा खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे, राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, फुरकान शेख, गणेश धोत्रे, शाहिद शेख, अतुल लोटके, दीपक घाटकर, अमृत आढाव, सतीष भवर, प्रशांत राठोड, महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री भिटे, ज्योती शिंदे, छाया माळी, सोनल भागवत यांच्या पथकाने केली.



