Chhatrapati Sambhaji Maharaj : हिंदुत्वाची व स्वराज्याची कास धरून छत्रपती संभाजी महाराजांचे स्वराज्याचे कार्य आपण पुढे नेऊ : आमदार संग्राम जगताप

Chhatrapati Sambhaji Maharaj : हिंदुत्वाची व स्वराज्याची कास धरून छत्रपती संभाजी महाराजांचे स्वराज्याचे कार्य आपण पुढे नेऊ : आमदार संग्राम जगताप

0
Chhatrapati Sambhaji Maharaj : हिंदुत्वाची व स्वराज्याची कास धरून छत्रपती संभाजी महाराजांचे स्वराज्याचे कार्य आपण पुढे नेऊ : आमदार संग्राम जगताप
Chhatrapati Sambhaji Maharaj : हिंदुत्वाची व स्वराज्याची कास धरून छत्रपती संभाजी महाराजांचे स्वराज्याचे कार्य आपण पुढे नेऊ : आमदार संग्राम जगताप

Chhatrapati Sambhaji Maharaj : नगर : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj)छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या काळात स्वराज्यावर आक्रमण करणारे हे त्यावेळचे दहशतवादीच (Terrorists) होते. आता असे अनेक दहशतवादी आजही देशावर हल्ला करत आहेत. हे दहशतवादी औरंग्याच्या अवलादी आहेत. दोन्ही छत्रपतींनी जीहाद्यांच्या विरोधार केलेला संघर्ष कायम लक्षात ठेवा. आपण छत्रपतींच्या विचाराचे मावळे आहोत. हिंदुत्वाची व स्वराज्याची कास धरून आपणही ही दहशतवादी जिहादी वळवळ बंद व्हावी यासाठी त्यांच्या विरोधात संघर्ष करू. छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारावर काम करून त्यांचे स्वराज्याचे कार्य आपण सर्वांनी पुढे नेऊ. त्या जीहादी दहादवाद्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल चार ओळी जरी वाचल्या तरी त्यांच्यात परिवर्तन होईल, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी केले.

नक्की वाचा : गावठी कट्ट्याचा धाक दाखवत रस्तालूट करणारे चौघे जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे प्राथमिक अनावरण

शहरातील प्रोफेसर कॉलनी चौकात महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे प्राथमिक अनावरण सोमवारी दुपारी आ.संग्राम जगताप यांनी वेद्मुर्तींच्या मंत्रोच्चारात पूजा करून केले. यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, शिवसेना जिल्हाप्रमुख आदिल शिंदे, माजी उपमहापौर गणेश भोसले, पुतळा कृती समितीचे अजिंक्य बोरकर, सतीश बारस्कर, मराठा महासंघाचे सुरेश इथापे, जिजाऊ ब्रिगेडच्या स्वाती जाधव यांच्यासह माजी नगरसेवक तसेच मोठ्या संख्यने शिवप्रेमी नागरिक व महायुतीतील पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी ढोल ताशांच्या गजरात छत्रपतींच्या जयजयकाराच्या जोरदार घोषणा दिल्या.

अवश्य वाचा: वाशीममधून अपहरण झालेल्या व्यक्तीची अहिल्यानगरमध्ये सुटका

आ.संग्राम जगताप पुढे म्हणाले, (Chhatrapati Sambhaji Maharaj)

अहिल्यानगर शहरात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारणी व अनावरण होणे हा सर्वात आनंदाचा क्षण व सुवर्णाक्षरांनी लिहिणाचा दिवस आहे. हा सोहळा प्राथमिक अनावरण सोहळा आहे, मंगळवार १६ डिसेंबरला ठरल्याप्रमाणे सकल मराठा व सकल शिवप्रेमींच्या वतीने दिमागदार सोहळ्याने या पुतळ्याचे लोकार्पण होणार आहे. धर्मरक्षक संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी अनेकांनी संघर्ष केला आंदोलन केले राजू ससे यांनी उपोषण केले. तत्कालीन नगरसेवक कैलास गिरवले यांनी महानगरपालिकेत ठराव केला. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनेही वेळोवेळी मागणी केली गेली. आता सर्वांची इच्छा व स्वप्न पूर्ण झाले आहे. पुतळा उभा राहिल्याने प्रत्येकाला मनापासून आनंद झाला आहे.

नगर शहरात भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणीचे काम झाले आहे. आता लवकरच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे काम लवकरच सुरू करू. पुतळे हे प्रेरणा देणारे व शहराची ओळख निर्माण करणारे स्मारके आहेत. या पुतळ्यामुळे शहराच्या वैभवात भरच पडली आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळा उभारणीसाठी ज्यांनी-ज्यांनी संघर्ष केला त्या सर्वांचे आभार मानतो. वेळोवेळी पालिकेच्या आयुक्तांनी व अधिकाऱ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानतो.

यावेळी सुरेश इथापे यांनी स्वागत केले. अनिल मोहिते, गणेश कवडे, ज्योती जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. अजिंक्य बोरकर यांनी आभार मानले. उद्धव कालापहाड यांनी सूत्रसंचालन केले. जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली.