Leopard Attack : संगमनेर : बिबट्याच्या हल्ल्यामध्ये (Leopard Attack) छोट्या सिद्धेश कडलगचा जीव गेला. त्याचे वडील सुरज कडलगसह सर्व नागरिक रस्त्यावर आले. मात्र, प्रशासन एसीमध्ये बसून आचारसंहितेचे (Code of conduct) कारण देत निवेदन स्वीकारण्यासाठी येत नव्हते. यामुळे आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) व डॉ. जयश्री थोरात (Dr. Jayshree Thorat) चांगल्याच आक्रमक झाल्या. आमदार तांबे यांनी प्रशासनाला जोरदार इशारा देताच प्रांताधिकारी हिंगे यांनी जनतेमध्ये येऊन निवेदन स्वीकारले.

नक्की वाचा : गावठी कट्ट्याचा धाक दाखवत रस्तालूट करणारे चौघे जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
लहान मुलांवर सातत्याने बिबट्यांचे हल्ले
संगमनेर तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या वाढली असून यामुळे नागरिकांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली आहे. याचबरोबर एका वर्षामध्ये 12 नागरिकांचा मृत्यू झाला असून सातत्याने बिबट्यांची हल्ले होत आहे. यावर प्रभावी उपाययोजना करावी, याकरता माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आमदार सत्यजित तांबे, डॉक्टर जयश्री थोरात यांच्यासह तालुक्यातील विविध पक्षांचे कार्यकर्ते व नागरिक महिला युवक यांच्या उपस्थितीमध्ये जनआक्रोश मोर्चा संपन्न झाला. मात्र निवेदन स्वीकारण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी यायला तयार नव्हते त्यामुळे आमदार सत्यजित तांबे व डॉ. जयश्री थोरात चांगल्याच आक्रमक झाल्या.
अवश्य वाचा: वाशीममधून अपहरण झालेल्या व्यक्तीची अहिल्यानगरमध्ये सुटका;
यावेळी आमदार तांबे म्हणाले की, (Leopard Attack)
बिबट्यांच्या दहशतमुक्ती विरोधाचे हे आंदोलन राजकीय नाही यामध्ये कुणाचा स्वार्थ नाही. ज्यांचा मुलगा डोळ्यादेखत उचलून नेला ते सुरज कडलग आणि सर्व समाज एकत्र आला आहे. या आंदोलन फक्त फोटोसाठी किंवा शोबाजीसाठी नाही तर न्याय मिळवून देण्यासाठी आहे. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आहे. जोपर्यंत शासनाचे प्रमुख अधिकारी येत नाही तोपर्यंत जागा कोणी सोडणार नाही. माझा जन्मच आंदोलनातून झाला आहे. आम्हाला जास्त आक्रमक व्हायला लावू नका अन्यथा कार्यकर्ते तुमच्या कार्यालयात घुसतील असा इशारा देताच प्रांत अधिकारी तातडीने खाली आले.

डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या, मी राजकीय पक्षाची कार्यकर्ती म्हणून नाही तर एक आई म्हणून आलेली आहे. ज्यांचे मुले मृत झाले त्यांची काय अवस्था आहे. हे प्रशासनाने समजून घ्यावे. थोडी तरी संवेदनशीलता दाखवा असे आव्हान करताना जनतेमध्ये या महिलांचे प्रश्न समजून घ्या, असा इशारा दिला. आमदार सत्यजित तांबे आणि डॉ. जयश्री थोरात यांची आक्रमक रूप पाहून उपस्थित हजारो नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर प्रांताधिकार्यांनी मोर्चाला सामोरे जात निवेदन स्वीकारले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे पोलीस निरीक्षक समीर बारवकर प्रवीण साळुंखे, वनविभागाचे सादर केदार अधिक सह विविध अधिकारी उपस्थित होते.



