BJP : जनमतचाचणीतून होणार भाजपच्या उमेदवारांची निश्चिती : विक्रम पाचपुते

BJP : जनमतचाचणीतून होणार भाजपच्या उमेदवारांची निश्चिती : विक्रम पाचपुते

0
BJP : जनमतचाचणीतून होणार भाजपच्या उमेदवारांची निश्चिती : विक्रम पाचपुते
BJP : जनमतचाचणीतून होणार भाजपच्या उमेदवारांची निश्चिती : विक्रम पाचपुते


BJP : नगर : महापालिका निवडणुकीत (Municipal Corporation Election 2025) ६८ जागांसाठी तब्बल ३१२ इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. निवडून येण्याची क्षमता हाच निकष उमेदवार निश्चितीसाठी असला तरी पक्षाकडून जनमतचाचणी केली जाणार असून त्या चाचणीच्या आधारेच उमेदवार निश्चित केले जाणार असल्याची माहिती भाजपचे (BJP) महापालिका निवडणूक प्रमुख आमदार विक्रम पाचपुते (Vikram Pachpute) यांनी दिली आहे.

अवश्य वाचा: बोल्हेगाव खून प्रकरणी चार महिला जेरबंद

इच्छूकांच्या सोमवारी (ता. १५) घेण्यात आल्या मुलाखती

महापालिका निवडणुकीसाठी इच्छूकांच्या मुलाखती सोमवारी (ता. १५) घेण्यात आल्या. या मुलाखतीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, समन्वयक विनायक देशमुख, अशोक गायकवाड, महिला जिल्हाध्यक्ष प्रिया जानवे आदी उपस्थित होते.

नक्की वाचा : अहिल्यानगर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले ; १५ जानेवारीला मतदान, १६ ला मतमोजणी

आमदार पाचुपते म्हणाले, (BJP)

भाजप महापालिकेची निवडणूक महायुती की स्वंतत्र याचा निर्णय प्रदेशपातळीवर होणार आहे. मात्र, सध्या तरी पक्ष सर्वच्या सर्व जागा लढविण्यास स्वबळावर देखील तयार आहे. कारण आज भाजप सर्वात मोठा पक्ष आहे.


श्रीगोंदा नगरपरिषदेच्या निवडणुकीत पक्षाने जनमतचाचणी करून उमेदवार ठरविले होते. त्यानुसार याही निवडणुकीत ते केले जाणार आहे. दरम्यान महापालिका निवडणुकीत महायुती म्हणून लढविण्यात येणार आहे. कोणाला किती जागा हे देखील प्रदेशपातळीवरून ठरणार आहे. या सर्व प्रक्रियेत पक्षाचा आदेश हाच अंतिम राहिले, असे आमदार पाचपुते म्हणाले.