China Manja : नगर : केडगाव येथील शास्त्रीनगर परिसरात विक्रीस बंदी असलेल्या (Banned for Sale) नायलॉन व चायनी मांजा (China Manja) विक्री करण्याऱ्या संशयित आरोपीला कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून तब्बल ९० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
९० हजारांचा मुद्देमाल हस्तगत
एकनाथ अशोक विरकर (वय ३२, रा. शास्त्रीनगर, केडगाव, अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. जिल्ह्यात नायलॉन व चायनी मांजा विक्री करण्यास बंदी असतानाही केडगाव परिसरात नायलॉन मांजाची वाहतूक व विक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळाली. त्यानुसार पथकाने शास्त्रीनगर परिसरात सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. त्याच्याकडून पांढ-या रंगाचे गोणीमध्ये पक्क्या धाग्याने बनविलेल्या ९० नायलॉन मांजाचे बंडल असा एकूण ९० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याबाबत पोलीस अंमलदार सुरज दिलीप कदम यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांच्या पथकाने केली कारवाई (China Manja)
ही कारवाई गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार बाळकृष्ण दौंड, साबीर शेख, वसीम पठाण, विशाल दळवी, विनोद बोरगे, रोहिणी दरंदले, अविनाश वाकचौरे, विजय ठोंबरे, दीपक रोहकले, सत्यम शिंदे, सुरज कदम, अभय कदम, शिरीष तरटे, अतुल कोतकर, अमोल गाडे, सचिन लोळगे, राम हंडाळ, संकेत धिवर, अतुल शेंडे, अतुल लाटे यांच्या पथकाने केली.



