Kotwali Police Station : नगर : अहिल्यानगर जीपीओ चौकातील पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office) शासकीय कामकाज सुरू असताना एका तरूणाने गोंधळ घालून कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केले. त्याला समजावण्यास गेलेल्या कर्मचाऱ्याला मारहाण (Assault) करून शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) तरूणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा : अहिल्यानगर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले ; १५ जानेवारीला मतदान, १६ ला मतमोजणी
कार्यालयातील लिपिकास शिवीगाळ
आसीफ रहेमान शेख (वय ५७, रा. दगडी चाळ मागे, मुकुंदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. रॉबीन अजित महाडकर ऊर्फ रॉकी (रा. ख्रिश्चन कॉलनी, तारकपूर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे. आसीफ हे जीपीओ पोस्ट ऑफिसमध्ये कार्यरत आहेत. ११ डिसेंबर रोजी रॉबीन महाडकर नावाचा तरूण पोस्ट ऑफिसमध्ये त्यांच्या कामासाठी आला होता. यावेळी त्याने आरडाओरडा करून कार्यालयातील लिपिक डाडर यांना शिवीगाळ केली.
अवश्य वाचा: बोल्हेगाव खून प्रकरणी चार महिला जेरबंद
पोलीसांना दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल (Kotwali Police Station)
कामात व्यत्यय येत असल्याने आसीफ शेख यांनी रॉबीनला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने आसीफ यांना शिवीगाळ करत मारहाण केली. या मारहाणीमुळे आसीफ जखमी झाले. त्यांनी जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार घेतले. त्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार एस. पी. बनकर करत आहेत.



