Devvrat Rekhe : दंडक्रम पारायण करणाऱ्या विक्रमादित्य देवव्रत रेखे यांचा ब्राह्मण सेवा संघाच्या वतीने सत्कार

Devvrat Rekhe : दंडक्रम पारायण करणाऱ्या विक्रमादित्य देवव्रत रेखे यांचा ब्राह्मण सेवा संघाच्या वतीने सत्कार

0

Devvrat Rekhe : नगर : अहिल्यानगरचे वेदमूर्ती महेशजी रेखे यांचे सुपुत्र असलेल्या विक्रमादित्य देवव्रत रेखे (Devvrat Rekhe) यांनी पुण्यभूमी काशी येथे दंडक्रम पारायण (Dand Kram Parayan) करून एक ऐतिहासिक (Historical) विक्रम साध्य केला आहे. अतिशय अवघड व दुर्मिळ असे दंडक्रम पारायण पूर्ण करणारे विक्रमादित्य देवव्रत महेश रेखे यांचा सत्कार केडगाव ब्राह्मण सेवा संघाच्या वतीने करण्यात आला.

अवश्य वाचा: बोल्हेगाव खून प्रकरणी चार महिला जेरबंद

संघाचे सदस्य व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित

यावेळी ॲड. उमेश नगरकर, ज्ञानेश देशपांडे, अजित कुलकर्णी, महेश कुलकर्णी, पंकज जहागीरदार, आनंद ठिपसे, किरण कुलकर्णी, राहुल पांडव, विनायक कुलकर्णी, नितीन क्षीरसागर, राकेश राव, स्वानंद महाराज जोशी तसेच संघाचे कार्यकारिणी सदस्य व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नक्की वाचा : अहिल्यानगर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले ; १५ जानेवारीला मतदान, १६ ला मतमोजणी

विविध मान्यवरांकडून या विशेष कार्याचे कौतुक (Devvrat Rekhe)

या अद्वितीय कार्याची दखल संपूर्ण देशासह जगभरातून घेतली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध स्तरांतील मान्यवरांनी या कार्याचे विशेष कौतुक केले आहे. न भूतो न भविष्यती अशा या दंडक्रम पारायणाची हजारो नामवंत व श्रेष्ठ व्यक्तींनी दखल घेतली आहे. या पवित्र कार्याबद्दल काशी नगरीत धन्य पिता–पुत्रांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. अहिल्यानगरसाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण असल्याची भावना व्यक्त करत ब्राह्मण सेवा संघाचे अध्यक्ष नंदकुमार पोळ यांनी विक्रमादित्य रेखे यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले.