Leopard : दहा दिवसांत बिबट्याचा बंदोबस्त करा, अन्यथा ‘पारनेर बंद’

Leopard : दहा दिवसांत बिबट्याचा बंदोबस्त करा, अन्यथा 'पारनेर बंद'

0
Leopard : दहा दिवसांत बिबट्याचा बंदोबस्त करा, अन्यथा 'पारनेर बंद'
Leopard : दहा दिवसांत बिबट्याचा बंदोबस्त करा, अन्यथा 'पारनेर बंद'

Leopard : पारनेर : पारनेर शहर (Parner City) आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने (Leopard) उच्छाद मांडला असून, दोन दिवसांत दोन महिलांवर हल्ले झाल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. वनविभागाच्या (Forest Department) संथ कारभाराविरोधात बुधवारी पारनेरमधील तरुणांनी वनविभागाच्या कार्यालयावर धडक देत तीव्र आंदोलन केले. “येत्या दहा दिवसांत बिबट्याचा बंदोबस्त करा, अन्यथा संपूर्ण पारनेर शहर बंद ठेवू” असे म्हणत आंदोलक तरुणांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांसमोर मागण्यांचा पाढा वाचला.

अवश्य वाचा: बोल्हेगाव खून प्रकरणी चार महिला जेरबंद

कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या मागण्या

पारनेर शहर व परिसरात तातडीने पिंजरे आणि ट्रॅप कॅमेरे बसवावेत. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून गस्त तीव्र करावी. पिंजरे आणण्यासाठी लोकांकडे पैशांची मागणी करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. तालुक्यातील सर्व वन कर्मचाऱ्यांची नावे आणि मोबाईल क्रमांक जाहीर करावेत. पारनेरसाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करून कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशा मागण्या करण्यात आल्या.

नक्की वाचा : अहिल्यानगर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले ; १५ जानेवारीला मतदान, १६ ला मतमोजणी

वन विभागाकडे पुरेसा निधी उपलब्ध नाही (Leopard)

आंदोलनादरम्यान वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन धाडे यांनी आपली बाजू मांडताना सांगितले की, “पिंजरा लावण्यासाठी नागपूरहून परवानगी घ्यावी लागते. तसेच विभागाकडे पुरेसा निधी उपलब्ध नाही. गावचे सरपंच मदत करतात, तुम्हीही वाहनांसाठी सहकार्य करा.”अधिकाऱ्यांच्या या उत्तरावर माजी नगरसेवक विशाल शिंदे, भाजपचे कल्याण थोरात, सतीश म्हस्के आणि उपस्थित तरुण चांगलेच संतापले. “बिबट्याचा बंदोबस्त करणे ही वनविभागाची नैतिक जबाबदारी आहे, त्यासाठी लोकांकडे मदत का मागता?” असा प्रश्नांचा भडीमार नेत्यांनी केला. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख निलेश खोडदे आणि वकील गणेश कावरे यांनीही वनविभागाच्या भूमिकेवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. वाढत्या दबावानंतर अधिकारी धाडे निरुत्तर झाले होते.

दिवसांची मुदत पाळली नाही तर तीव्र आंदोलना (Leopard)

आंदोलनाची दखल घेत आमदार काशिनाथ दाते यांनी वन अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने पिंजरे उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. दुसरीकडे, पारनेर नगरपंचायत प्रशासनानेही बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आवश्यक ठराव वनविभागाला दिल्याची माहिती नगराध्यक्षा डॉ. विद्या कावरे व पाणीपुरवठा सभापती योगेश मते यांनी दिली. अखेर वनविभागाने पारनेर पब्लिक स्कूल परिसर, सेनापती बापट तलाव आणि समर्थ नगर येथे पिंजरे लावल्याची माहिती दिली. तसेच लवकरच अधिक पिंजरे लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आपले आंदोलन तात्पुरते मागे घेतले. मात्र, दहा दिवसांची मुदत पाळली नाही तर तीव्र आंदोलनाचा पुनरुच्चार करण्यात आला आहे. या आंदोलनात विशाल शिंदे, कल्याण थोरात, सतीश म्हस्के, अण्णा सोबले, अशोक औटी, बबलू दावभट, किशोर आढाव, इंद्रजित देशमुख, विजय दावभट, महेंद्र बोरुडे यांसह शेकडो तरुण उपस्थित होते.