Culpable Homicide : नगर : राहुरी तालुक्यातील मोमीन आखाडा येथील विवाहितेच्या सदोष मनुष्यवधा (Culpable Homicide) प्रकरणी पती व जावेला जिल्हा सत्र न्यायालयाने (District Sessions Court) दोषी ठरवत १० वर्षांच्या सक्तमजुरीची (Forced Labor) शिक्षा ठोठावली आहे. प्रदीप विठ्ठल गाडे (वय ४२) व अलका संदीप गाडे (वय ३५, रा. मोमीन आखाडा, ता. राहुरी) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी सरकारी वकील म्हणून अतिरीक्त सरकारी अभियोक्ता अर्जुन पवार यांनी काम पाहिले.
अवश्य वाचा: बोल्हेगाव खून प्रकरणी चार महिला जेरबंद
राहुरी पोलीस ठाण्यात दिली हाेती फिर्याद
९ फेब्रुवारी २०१९ रोजी फिर्यादी गीताराम जयवंत शेटे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की, त्यांची मुलगी ज्योती प्रदीप गाडे तिचे लग्न आरोपी प्रदीप याच्या बरोबर एक मे २००७ रोजी झालेले होते. त्या दोघांना एक मुलगा व एक मुलगी आहे. प्रदीप व अलका या दोघांचे अनैतिक संबंध होते. प्रदीप दारु पिऊन ज्योतीला मारहाण करायचा. ७ फेब्रुवारी २०१९ रोजी विजय गाडे यांनी फोन करून गीताराम शेटे यांना सांगितले की, तुमची मुलगी ज्योती हिने विषारी औषध प्राशन केले आहे व तिला जिल्हा रुग्णालयात नेले आहे. त्यानंतर शेटे यांनी ज्योतीला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारा दरम्यान ज्योतीचा ८ फेब्रुवारी २०१९ला सकाळी मृत्यू झाला.
नक्की वाचा : अहिल्यानगर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले ; १५ जानेवारीला मतदान, १६ ला मतमोजणी
ज्योती व प्रदीपच्या मुलाने सांगितले की, (Culpable Homicide)
किरकोळ कारणावरून अलकाच्या सांगण्यानुसार प्रदीपने ज्योतीला मारहाण केली होती. ज्योती हिचा अंत्यविधी झाल्यानंतर शेटे यांनी वरील दोन्ही आरोपीविरुध्द राहरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक जे. बी. शिरसाठ यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले. तसेच आरोपी पक्षातर्फे एक साक्षीदार तपासण्यात आला. न्यायालयाच्या रेकॉर्डवर आलेला साक्षीपुरावा न्यायालयाने ग्राह्य धरून आरोपीला दोषी धरले. प्रकरणात वैद्यकीय साक्षीपुरावा व मुलगा सार्थक याची साक्ष तसेच न्यायालयाचे रेकॉर्डवर असणारा कागदोपत्री पुरावा महत्त्वाचा मानण्यात आला. आरोपींना दोषी धरून न्यायालयाने सदोष मनुष्यवध केल्याप्रकरणी दोन्ही आरोपींना १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.



