Theft : वृद्ध महिलेच्या घरातून अडीच तोळ्याचे दागिने लंपास; गुन्हा दाखल

Theft : वृद्ध महिलेच्या घरातून अडीच तोळ्याचे दागिने लंपास; गुन्हा दाखल

0
Theft : वृद्ध महिलेच्या घरातून अडीच तोळ्याचे दागिने लंपास; गुन्हा दाखल
Theft : वृद्ध महिलेच्या घरातून अडीच तोळ्याचे दागिने लंपास; गुन्हा दाखल

Theft : नगर : विनायकनगर भागातील शीतल विहार परिसरात एका वृध्द महिलेच्या घरातून अडीच तोळ्याची सोन्याची माळ चोरीला (Theft) गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) गुन्हा दाखल (Crime registered) करण्यात आला आहे. शहरातील लता निवृत्ती खेडकर (वय ६८) यांनी फिर्याद दिली आहे.

अवश्य वाचा: दहा दिवसांत बिबट्याचा बंदोबस्त करा, अन्यथा ‘पारनेर बंद’

१० ते १२ डिसेंबरला रात्री साडेनऊच्या दरम्यान चोरी

इलेक्ट्रीशियनचे काम करणारा गुलाब निमसे व वॉलपेपरचे काम करणारा राजू (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीच्या घराचे दुरूस्ती काम सुरू आहे. १० ते १२ डिसेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान ही चोरी झाली.

नक्की वाचा : महायुती म्हणून महापालिका लढवण्याचा प्रयत्न : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

नूतनीकरणाचे काम करणाऱ्या कामगारांवर संशय (Theft)

अडीच तोळ्याची दोन पदरी सोन्याची माळ चोरट्यांनी फिर्यादीच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरून नेली. फिर्यादीच्या घरी सध्या नूतनीकरणाचे काम सुरू असून, यावेळी कामावर असलेल्या इलेक्ट्रीशियन आणि वॉलपेपर लावणाऱ्या कामगारांनी हा ऐवज चोरला असावा, असा संशय फिर्यादीत व्यक्त केला आहे.