Burglary : नगर : सावेडी परिसरातील विराज कॉलनी येथे अज्ञात चोरट्यांनी मागील दरवाजाचे लॉक तोडून घरफोडी (Burglary) करत सोने, चांदी, डायमंडचे दागिने (Gold Silver & Diamond Jewellery) व सात लाखांची रोकड असा एकूण १४ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात (Tofkhana Police Station) अज्ञात व्यक्तीविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवश्य वाचा: दहा दिवसांत बिबट्याचा बंदोबस्त करा, अन्यथा ‘पारनेर बंद’
जयपूर येथे कार्यक्रमासाठी गेले होते बाहेर
व्यावसायिक अशोककुमार विजयकुमार अग्रवाल (वय ५०) यांनी फिर्याद दिली आहे. अशोककुमार हे कुटुंबासह सावेडीतील विराज कॉलनी, बंगला क्रमांक ६ येथे वास्तव्यास आहेत. १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता जयपूर येथे नातेवाईकांच्या कार्यक्रमासाठी ते कुटुंबासह गेले होते. घराचे सर्व दरवाजे कुलूप लावून बंद करण्यात आले होते. दरम्यान, १६ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास शेजारी राहणारे विनोद सुरपुरीया यांना घरात काम करणाऱ्या पार्वती वाडेकर यांनी घराचा मागील दरवाजा उघडा असल्याची माहिती दिली. यानंतर घरात जाऊन पाहणी केली असता बेडरूममधील सामान अस्ताव्यस्त असल्याचे आढळून आले.
नक्की वाचा : महायुती म्हणून महापालिका लढवण्याचा प्रयत्न : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
बेडरूममधील कपाटे उघडी व लॉकर तुटलेले आढळले (Burglary)
याची माहिती मिळताच अशोककुमार यांनी बुधवारी (ता. १७) पहाटे ३ वाजता जयपूरहून अहिल्यानगर गाठले. त्यांनी पाहणी केली असता घरातील दोन्ही बेडरूममधील कपाटे उघडी व लॉकर तुटलेले आढळले. त्यामधील सोन्या चांदीचे व डायमंडचे दागिने, रोख रक्कम तसेच सीसीटीव्हीचा डीव्हीआर हार्डडिस्क असा एकूण १४ लाख ७५ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरी गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.



