Sandalwood Smuggling : नगर: नाशिकमधून चंदनाची तस्करी (Sandalwood Smuggling) करून श्रीरामपूर मध्ये विक्रीसाठी आणणाऱ्या संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने आज(१९) पहाटे जेरबंद केले आहे. त्याच्याकडून पाच लाख ७० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याबाबत लोणी पोलीस ठाण्यात (Loni Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवश्य वाचा: जामखेड मधील हॉटेलमध्ये गोळीबार; हॉटेल मालक गंभीर जखमी
ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव
हनुमंता भिमा मोरे (वय-४५,रा. उंबरगाव ता, श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. तर उत्तम नारायण पवार (रा. पळसे साखर कारखाना शेजारी, ता.सिन्नर जि.नाशिक) हा पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना चंदनाची लाकडे विक्री करण्याचे उद्देशाने नांदुर शिंगोटे मार्गे श्रीरामपूरकडे येत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तळेगाव ते लोणी रस्त्यावर सापळा रचून संशयित आरोपी ताब्यात घेतले.
नक्की वाचा : जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही: मुख्यमंत्री
३० किलो चंदनाची लाकडे हस्तगत (Sandalwood Smuggling)
त्याच्याकडून ६० हजार रुपयांचे ३० किलो चंदनाची लाकडे, व पाच लाखांचे वाहन असा एकूण ५ लाख ७० हजरांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार राहुल द्वारके, भिमराज खर्से, राहुल डोके, प्रमोद जाधव, सतीश भवर, सुनील मालणकर, चालक महादेव भांड यांच्या पथकाने केली.



