
Illegal liquor : नगर : आगामी अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या (Ahilyanagar Municipal Corporation Election) पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (State Excise Department) पथकाने तारकपूर परिसरातील एका हॉटेलवर छापा टाकून अवैध दारू (Illegal liquor) २९ लाख ५९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अवश्य वाचा: जामखेड मधील हॉटेलमध्ये गोळीबार; हॉटेल मालक गंभीर जखमी
खात्रीशीर माहितीच्या आधारे कारवाई
समरजित कवलजीत सिंग गंभीर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस अधीक्षक प्रमोद सोनोने यांना मिळालेल्या माहितीनुसार तारकपूर परिसरात गोवा राज्यातील दारू महाराष्ट्रात बंदी असतानाही विक्री व साठवणूक केली जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क च्या भरारी पथक क्र.१ ने सापळा रचून छापा टाकला.
नक्की वाचा : जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही: मुख्यमंत्री
संशयित आरोपी पसार (Illegal liquor)
यावेळी एका वाहनामध्ये विदेशी मद्याचे विविध ब्रँडच्या २०४ बॉक्स व वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली वाहन असा एकूण २९ लाख ५९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. मात्र, यातील संशयित आरोपी हा पसार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक सुरज कुसळे, निरीक्षक कुमार ढावरे, बाबुराव घुगे, दुय्यम निरीक्षक आनंद जावळे, उमेश ढोले, श्रुष्टी भागवत, जवान सुरज पवार, सुनील निमसे, चतुर पाटोळे, प्रथमेश पंडित, प्रवीण सागर, दिनेश खैरे, नेहाल उके, प्रवीण साळवे व महिला जवान अर्चना दहिफळे, विद्या आव्हाड, जिया पठाण यांच्या पथकाने केली आहे.


