
Hydroelectric project : नगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली राज्याला ‘पंप स्टोरेज हब’ बनविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान झालेल्या सामंजस्य करारांतर्गत अकोले तालुक्यात २०० मेगावॅट क्षमतेचा ‘सरोवर उदंचन जलविद्युत प्रकल्प’ (Hydroelectric project) उभारण्यात येणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिली.
अवश्य वाचा: जामखेड मधील हॉटेलमध्ये गोळीबार; हॉटेल मालक गंभीर जखमी
सुमारे १ हजार ५० कोटींची गुंतवणूक होणार
या प्रकल्पासाठी ‘न्यु एशियन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. अकोले तालुक्यात सुमारे १ हजार ५० कोटी रुपयांची गुंतवणूक या माध्यमातून होणार असून, यामुळे स्थानिकांसाठी दोन हजार रोजगार निर्मिती होणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

नक्की वाचा : जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही: मुख्यमंत्री
राज्याच्या वीजनिर्मितीत ५ हजार ८०० मेगावॅटची भर (Hydroelectric project)
राज्यात उदंचन जलविद्युत प्रकल्पांसाठी एकूण ५४ सामंजस्य करार करण्यात आले आहेत. यामध्ये अकोले येथील प्रकल्पासह पश्चिम घाट (५ हजार २०० मेगावॅट) व कोयना टप्पा-६ (४०० मेगावॅट) या महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. या करारांतून राज्यात सुमारे २३ हजार ८०० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून, ११ हजार ५०० नवीन रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या सर्व प्रकल्पांमुळे राज्याची वीजनिर्मिती क्षमतेत ५ हजार ८०० मेगावॅटची भर पडणार आहे, असेही विखे पाटील यांनी स्पष्ट केले.


