
नगर : राज्यातील २३ नगरपालिकांसह ७६ नगरपंचायतीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार (Rohit Pawar)यांनी मतदार चोरी (Voter theft) आणि पैसे वाटल्याच्या आरोपावरुन भाजप (Bjp) आणि शिवसेना शिंदे (Shivsena) गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. निवडणूक आयोगाने निवडणुका घेण्याचा अट्टाहास न करता थेट बोली लावूनच भाजपच्या नगरसेवकांना विजयी घोषित करावं, अशी टीका रोहित पवारांनी केली आहे.
नक्की वाचा: राज्यात थंडीचा कडाका वाढला;अहिल्यानगरमध्ये पारा ६ अंशावर
नेमकं काय म्हणाले रोहित पवार? (Rohit Pawar)

अंबरनाथ नगरपरिषदेत शिंदेंच्या शिवसेनेने २०० बोगस मतदार आणल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. तर त्याच ठिकाणी भाजपच्या उमेदवारांकडून मतदारांना पैसे वाटताना अजित पवारांच्या राष्ट्रवादीने दोघांना पकडून भरारी पथकाच्या ताब्यात दिल्याचे रोहित पवार म्हणाले. त्याचबरोबर नांदेडच्या धर्माबाद मध्ये पैशाचं आमिष दाखवून भाजपने शेकडो मतदारांना कोंडून ठेवत लोकशाहीचा जाहीर लिलाव मांडल्याची टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
अवश्य वाचा: दिल्ली विमानतळावर प्रवाशाला पायलटकडून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
‘निवडणूक आयोगाने भाजपच्या नगरसेवकांना विजयी घोषित करावं’ (Rohit Pawar)
लोकशाहीचं असं वस्त्रहरण होत असताना कोणत्याही परिस्थितीत भाजपला सत्ता मिळवून देण्याच्या मोहात अडकलेला निवडणूक आयोग मात्र ध्रुतराष्ट्राप्रमाणे डोळ्याला पट्टी बांधून शांत बसल्याची टीका रोहित पवारांनी केली आहे. हे असंच चालत असेल तर निवडणूक आयोगाने निवडणुका घेण्याचा फार्स न करता थेट बोली लावूनच भाजपाच्या नगरसेवकांना विजयी घोषित करावं, असे मत रोहित पवार यांनी व्यक्त केलं आहे. त्यांच्या विजयाच्या जल्लोषात सहभागी होऊन गुलाल अंगावर घ्यायलाही हरकत नाही. यामुळं किमान निवडणुकीसाठी खर्च होणारा सरकारी तिजोरीतील पैसा तरी वाचेल,असं रोहित पवार म्हणाले.


