Traffic Jam : अहिल्यानगर शहरात वाहतूक कोंडी

Traffic Jam : अहिल्यानगर शहरात वाहतूक कोंडी

0
Traffic Jam : अहिल्यानगर शहरात वाहतूक कोंडी
Traffic Jam : अहिल्यानगर शहरात वाहतूक कोंडी

Traffic Jam : नगर : अहिल्यानगर शहरात (Ahilyanagar city) महापालिकेच्या पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरु असल्याने अहिल्यानगर- छत्रपती संभाजीनगर महामार्गावर (Ahilyanagar – Chhatrapati Sambhajinagar highway) एसबीआय चौक ते डीएसपी चौक या दरम्यान वाहतूक कोंडी (Traffic Jam) झाली आहे.

अवश्य वाचा: रोहित पवारांवर गोळीबार करणारे जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

वाहन चालकांना मोठा मनस्ताप

नगर- छत्रपती संभाजीनगर महामार्गावर नटराज हॉटेल परिसरात महानगरपालिकेची पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन नादुरुस्त झाल्याने तिचे दुरुस्तीचे काम महापालिकेच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. रस्ता खोदल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे महापालिकेच्या अनागोंदी कारभाराचा वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

Traffic Jam : अहिल्यानगर शहरात वाहतूक कोंडी
Traffic Jam : अहिल्यानगर शहरात वाहतूक कोंडी

नक्की वाचा : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर होणार कारवाई; पोलीस प्रशासनाचा इशारा

रस्ता खोदल्याने वाहतुकीस अडथळा (Traffic Jam)

पाईपलाईनचे दुरुस्तीचे काम महापालिकेने आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हाती घेतले. जेसीबीच्या साह्याने रस्ता खोदल्याने वाहतुकीस अडथळा झाला. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या घटनेची माहिती मिळताच शहर वाहतूक पोलिसांचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होत ही वाहतूक सुरळीत करत आहेत.