Bajrang Dal : नगर : अहिल्यानगरचे सुपुत्र विवेक कुलकर्णी (Vivek Kulkarni) यांची अखिल भारतीय बजरंग दलाच्या (Bajrang Dal) राष्ट्रीय सहसंयोजक पदी निवड करण्यात आली. उत्तर प्रदेश येथील हस्तीनापूर जैन धार्मिक तीर्थक्षेत्र मेरठ येथे विश्व हिंदू परिषदेची (Vishwa Hindu Parishad) केंद्रीय प्रन्यासी मंडल बैठक पार पडली. या बैठकीत ही निवड करण्यात आली.
अवश्य वाचा: रोहित पवारांवर गोळीबार करणारे जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
अनेक पदे विवेक कुलकर्णी यांनी भुषवली
यावेळी विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष ॲड अलोक कुमार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पूर्व सरकार्यवाह तथा विशेष हिंदू परिषद पालक भैय्याजी जोशी, आंतरराष्ट्रीय महामंत्री बजरंग बागडा, केंद्रीय संघटन मंत्री मिलींद परांडे, केंद्रीय सहमंत्री प. पू. दादा वेदक, मुंबई क्षेत्र मंत्री रामचंन्द रामुकाजी, क्षेत्र सह मंत्री प्राचार्य अनंत पांडे, संघटन मंत्री अनिरुद्ध पंडीत, महाराष्ट्र प्रांत मंत्री किशोर चव्हाण, प्रांत सह मंत्री ॲड सतीश गोरडे, नितीन वाटकर आदी उपस्थित होते. अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड हे कुलकर्णी यांचे जन्मगाव आहे. जामखेड तालुका सह कार्यवाह, अहिल्यानगर सह मंत्री विश्व हिंदू परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रान्त सह संयोजक, पश्चिम महाराष्ट्र प्रान्तसह मंत्री, मुंबई क्षेत्र बजरंग दल सह संयोजक, मुंबई क्षेत्र बजरंग दल संयोजक अशी अनेक पदे विवेक कुलकर्णी यांनी भुषवली आहेत. जिहादी आतंकवादी देश विरोधी कारवाया, लव जिहाद, धर्मांतरण, गोहत्या बंदी अशा अनेक सामाजिक विषयांवर आंदोलने करून देव देश आणि धर्मासाठी कार्य करीत आहेत.
नक्की वाचा : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर होणार कारवाई; पोलीस प्रशासनाचा इशारा
विवेक कुलकर्णी म्हणाले, (Bajrang Dal)
बजरंग दल हे देशातील हिंदू तरुणांचे मोठे संघटन आहे. अखिल भारतीय बजरंग दलाच्या माध्यमातून गोसेवा, राष्ट्रसेवा व हिंदुत्वाचे कार्याचा देशभरातील हिंदू युवकांमध्ये जागर करणे. तसेच हिंदू युवकांना राष्ट्रभक्तीस प्रेरित करून व्यसनांपासून दूर ठेवणे. देशातील लव जिहाद, गोहत्या,धर्मांतरण बंद करणे, जिहादी आतंकवाद या विषयावर समाज प्रबोधन करणे. तसेच बजरंग दलाच्या माध्यमातून देशातील विविध समस्या सोडविणे हे उद्दिष्ट आहे.



