Balasaheb Thorat : अहिल्यानगर शहरात बंधू-भावाचे वातावरण दिसत नाही : माजी मंत्री थोरात

Balasaheb Thorat : अहिल्यानगर शहरात बंधू-भावाचे वातावरण दिसत नाही : माजी मंत्री थोरात

0
Balasaheb Thorat : अहिल्यानगर शहरात बंधू-भावाचे वातावरण दिसत नाही : माजी मंत्री थोरात
Balasaheb Thorat : अहिल्यानगर शहरात बंधू-भावाचे वातावरण दिसत नाही : माजी मंत्री थोरात

Balasaheb Thorat : नगर : अहिल्यानगर शहरात (Ahilyanagar city) अनेक प्रश्न आहेत. रस्ते लाईट, गटार यापलीकडेही काही गोष्टी आहेत. शहर कसे आहे, हे एका कुटूंबासारखे आहे का?, समाजा-समाजात प्रेम आहे का? याला ही खूप महत्व आहे. शहरात बंधू-भावाचे वातावरण दिसत नाही, असा प्रश्न उपस्थित करत माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे.

अवश्य वाचा: रोहित पवारांवर गोळीबार करणारे जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

शहर जितके चांगले पाहिजे तितके बनू शकलो नाही ही खंत

माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे आज (ता. २२) अहिल्यानगर येथे आले असता ते आयल्व्हनगरशी बोलत होते. यावेळी थोरात म्हणाले, अहिल्यानगर शहराचा म्हणावा तसा विकास झाला नाही. जितके चांगले शहर पाहिजे तितके आम्ही बनू शकलो नाही, ही खंत आज आम्हाला आहे. कारण नेतृत्व करण्याची संधी आम्हाला जितकी पाहिजे तितकी मिळाली नाही.

नक्की वाचा : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर होणार कारवाई; पोलीस प्रशासनाचा इशारा

महापालिकेच्या निवडणुकीत आघाडी म्हणून लढणार (Balasaheb Thorat)

अहिल्यानगर शहारातील रस्त्याची परिस्थिती बिकट झाली आहे. आगामी महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढणार आहोत. अहिल्यानगर शहरात शांतता तसेच सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही मतदारांच्या हातात आहेत. त्यांनी योग्य उमेदवारांना निवडून दिले पाहिजे. अहिल्यानगर शहराचे वातावरण दूषित झाले आहे. आम्हाला संधी दिल्यास ते आम्ही नक्कीच बदलण्याचा प्रयत्न करू असे त्यांनी म्हटले आहे.